पान:पाकिस्तानचे संकट.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ पाकिस्तानचे संकट मागणी बरीच जुनी आहे. १९३५च्या कायद्याने ती मागणी मान्य करण्यांत आली व बिहार आणि ओरिसा वेगळे झाले. बिहारप्रांताचे क्षेत्रफळ ६९,३४८ चौरस मैल आहे व १९३१च्या शिरगणतीप्रमाणे या प्रांताची लोकसंख्या २,५७,२७,५०० आहे. यांत मुसलमानांची संख्या ४१,४०,३२७ म्हणजे जवळजवळ शेकडा १५ इतकी आहे. my ७. ओरिसा - नव्यानेच स्वतंत्र झालेल्या या प्रांताचें क्षेत्रफळ ३२,६९५ चौरस मैल असून १९३१च्या शिरगणतीप्रमाणे त्याची लोकसंख्या ५३,०६,१४२ आहे. मुसलमानांची लोकसंख्या १,३१,२३३ म्हणजे जेमतेम शेकडा २ इतकीच आहे. मध्यप्रांत वाट - मध्यप्रांत या नांवाचा स्वतंत्र प्रांत १८६१ साली बनविण्यांत आला. १९०३ साली निजामनें व-हाड प्रांत कायमच्या भाडेपट्टयाने ब्रिटिशांना दिल्यावर तो या प्रांताला जोडण्यात आला. १९२० सालापर्यंत हा प्रांत दुय्यम दर्जाचा समजण्यांत येत असे. त्यामुळे चीफ कमिशनर हाच या प्रांताचा मुख्य अधिकारी असे. १९२० साली या प्रांताचा दर्जा वाढला व चीफ कमिशनरच्या जागी गव्हर्नर आला. मध्यप्रांताचे क्षेत्रफळ ८२,१०९ चौरस मैल असून वन्हाडचे क्षेत्रफळ १७,७६७ चौरस मैल आहे. १९३१ च्या शिरगणतीप्रमाणे मध्यप्रांताची लोकसंख्या १,२०,६५,८८५ असून वहाडची लोकसंख्या ३४,४१,८३८ आहे. मध्यप्रांताच्या लोकसंख्येत मुसलमान ३,८३,१७४ असून त्यांचे शेकडा प्रमाण ३.८ आहे. व-हाडांत २,९९,६८० मुसलमान असून त्यांचे शेकडा प्रमाण ८७ आहे. वहाडवरील आपल्या स्वामित्वाच्या खुणा पुनरुज्जीवित करण्याचे -नेटाचे प्रयत्न निजामाकडून केले जात आहेत व सत्तारहित स्वामित्वाचें समाधान तरी त्याला तूर्त मिळत आहे, असे म्हणण्याला हरकत नाही. याचा परिणाम हळहळ दिसू लागला आहे. पाकिस्तानच्या अलीगड-योजनेंत हैद्राबाद संस्थानाबरोबर व-हाडहि जोडन देण्यात आलेला असून, त्या सर्व