पान:पाकिस्तानचे संकट.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रांतांची अडाणी मांडणी १०१ और क्रम १९३० पूर्वीपासूनच सुरू झालेला असून,* तो आजतागायत । स चाललेलाच आहे. चहाच्या मळ्यांवर या प्रांताचें सारे वैभव अवलंबून आहे. १९३३ साली हिंदुस्थानांत चहाच्या लागवडीने व्यापलेली एकंदर जमीन ८,०९,००० एकर होती. त्यांतली ४,३०,००० एकर जमीन फक्त आसाममधील होती. १९३३ साली ३७ कोटी ९० लक्ष पौंड चहा विक्रीसाटी हिंदुस्थानाबाहेर गेला होता. त्यांतला आसाममधून किती गेला असेल याची कल्पना स्थूलमानाने सहज करता येण्यासारखी आहे. बाहेर गेलेल्या चहाची त्या वर्षांतली एकंदर किंमत १७ कोटी १५ लक्ष रुपये होती. आसामच्या वाटणीला यांतला केवढा हिस्सा येईल हे तर्काने समजण्यासारखे आहे. चहाच्या मळ्यांत जें भांडवल गुंतलेले आहे त्यांतलें पाऊण हिस्सा भांडवल युरोपियनांचे आहे. पाकिस्तानच्या मुसलमानांनी मांडलेल्या योजनांपैकी लतीफ-योजनेनें पूर्वबंगाल व आसाम यांची सांगड घातलेली आहे. अलीगडच्या दोन विद्वालांनी आसाममधील सिल्हेट भाग बंगाली पाकिस्तानमध्ये दडपला आहे. चहाच्या किफायतशीर धंद्यावर स्वार्थी नजर ठेवूनच ही सर्व योजना आखण्यांत आली असावी, अशी शंका कोणी घेतली तर ती अगदीच निराधार ठरण्यासारखी नाही. ६. बिहारमा पूर्वी बंगालशी निगडित झालेले बिहार-ओरिसा हे प्रांत १९१२ साली बंगालमधून वेगळे काढण्यात आले. १९३३ पर्यंत बिहार-ओरिसा प्रांतांतच छोटा-नागपूर विभागाचा समावेश होत असे. बिहार व ओरिसा या दोन प्रांतांमधील भेदांना थेट भाषेपासून सुरुवात होते. बिहारमध्ये हिंदी भाषा रूढ आहे तर, ओरिसाचे लोक ओरिया किंवा उडिया ही भाषा बोलणारे आहेत. आपला प्रांत अगदी स्वतंत्र करण्यात यावा, ही ओरिसामधील लोकांची Indian Statutory Commission Vol. I Survey, p. 74. Pakistan by Dr. Rojendra Prasad, p. 42. $Pakistan by Dr, Rajendra Prasad, p. 36.