पान:पाकिस्तानचे संकट.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट तकी भरते. एकंदर लोकसंख्येत सुमारे ५२.५ लक्ष हिंदु आहेत, २७-२८ लक्ष मुसलमान आहेत, २.५ लक्षांच्या आसपास ख्रिस्ती आहेत आणि टोळीवाल्यांच्या जमातींची एकत्रित संख्या सुमारे १० लक्ष आहे. या प्रांतांत डोंगराळ भाग फार आहे. आसाम व्हॅली व सुर्मा व्हॅली या दोन भागांतच लोकवस्ती फार आहे. १९२१च्या शिरगणतीत आसामच्या खालसा भागाची लोकसंख्या ७५ लक्ष भरली होती. त्यांतली ६५ लक्ष लोकसंख्या या दोन विभागांतच होती. १९२१ च्या शिरगणतींत आसामच्या लोकसंख्येपैकी ३५ लक्ष बंगाली असल्याचे आढळले व १७-१८ लक्ष लोक आसामी असल्याचे आढळले. हे सर्व लोक या दोन प्रमुख भागांतच वास्तव्य करणारे आहेत. पण का चहाच्या मळ्यांच्या वाढीमुळे आसाम व्हॅली विभागाची लोकसंख्या १९०१ ते १९२१ या वीस वर्षांत १० लक्षांनी वाढली. सुर्मा व्हॅलीमधीलं सिल्हेट जिल्हा मोठा आहे. त्यांतहि लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आलेली आहे. आसाम व्हॅलीमधला गोलपारा विभाग व सुर्मा व्हॅलीमधला सिल्हेट विभाग यांमध्ये बंगाली लोकांची वस्ती पुष्कळ आहे. यामुळे सिल्हेट जिल्हा फिरून बंगालमध्ये सामील व्हावा अशा आशयाचा ठरावहि कौन्सिलांत एकदां पास झाला होता. अलीकडे मात्र, आसामचे कोणतेहि जिल्हे वंगालमध्ये सामील होऊं नयेत, हे लोकमत प्रबळ झालेले आहे. सिल्हेट भागाची लोकवस्ती १९२१च्या शिरगणतीप्रमाणे २५ लक्ष होती व यांत मुसलमान बहुसंख्य होते.* सिल्हेट जिल्हयाच्या लोकवस्तींत मुसलमानांचे प्रमाण ५९.२ आहे, असे डॉ. आंबेडकर यांनीहि म्हटले आहे. गोलपारा विभागांत मसलमानांचे प्रमाण ४२.८ आहे असें डॉ० आंबेडकर म्हणतात. सिल्हेट भागाचे क्षेत्रफळ सुमारे ५,००० चौरस मैल असून, गोलपारा भागाचे क्षेत्रफळ o,°°°चारस मल आह. या पूर्व बंगालमधून निघन मुसलमानांनी आसामांत घसावें व त्या भागांतली आपली लोकसंख्या त्यांनी वाढवावी हा

  • Indian Statutory Commission. Vol. I. Survey, p. 74, fThoughts on Pakistan, p. 357. marosan