पान:पाकिस्तानचे संकट.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रांतांची अडाणी मांडणी विभक्तीकरणाला हातभार लाविला ! पंजाबच्या विभक्तीकरणाला काल्व्हर्टसारखे धूर्त इंग्रज प्रोत्साहन देत आहेत, हे 'पंजाबी' यानी Confederacy of India या आपल्या पुस्तकांत काल्व्हर्टच्या The Wealth and Welfare of the Punjab या पुस्तकाच्या आधारें में विवेचन केलें आहे त्यावरून स्पष्ट होत आहे.* १९३३-३४ साली बंगालमधून तागाच्या मालाची जी निर्यात झाली ती किती आणि किती मोलाची होती यासंबंधीचे आंकडे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. १४,२०,००० टन वजनाचा तागाचा माल त्या सालीं निर्गत झाला आणि या मालाची किंमत सुमारे ३२ कोटी ३३ लक्ष रुपये ठरली. हे आंकडे नजरेसमोर खेळ लागले म्हणजे असे वाटते की, बंगालमधील तागाच्या गिरण्यांच्या धंद्यावर लोभी नजर ठेवणाऱ्या लोकांकडून पाकिस्तानचा पाठपुरावा केला जात असला पाहिजे... कानी आसाम १८७४ साली आसामला काहींसें स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. १९०५ च्या फाळणीच्या वेळी आसामची पूर्वबंगालबरोबर सांगड घालण्यात आली होती; पण, फाळणी रद्द झाल्यावर म्हणजे १९१२ साली आसाम स्वतंत्र घटक म्हणून पूर्वीप्रमाणे बंगालकडे आला. १९१९ च्या घटना कायद्याने या प्रांताचा राजकीय दर्जा वाढला व त्यावर स्वतंत्र गव्हर्नरची नेमणूक होऊ लागली. जण कवि . आसामच्या उत्तर व पूर्व सीमेकडील काही भाग प्रांतिक स्वायत्ततेच्या कक्षेत पूर्णपणे सामील करण्यांत आलेला नाही. हा भाग वगळला म्हणजे या प्रांताचें क्षेत्रफळ ५५,०१४ चौरस मैल उरतें. आसामचे जे तीन महत्त्वाचे विभाग आहेत त्यांत मणिपूर हा एक संस्थानी विभाग आहे. त्याचे क्षेत्रफळ ८,६२० चौरस मैल आहे. १९३१च्या शिरगणतीप्रमाणे या प्रांताची लोकसंख्या ९२,४७,८५७ आहे. यांतली ४,४५,६०६ इतकी लोकसंख्या मणिपूरांत आहे. म्हणजे आसामच्या खालसा भागाची लोकसंख्या ८८,०२,२५१ *The Confederacy of India, pp. 101-17..