पान:पाकिस्तानचे संकट.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट या ६२.५ लक्ष ख्रिस्ती लोकसमूहांतले शेकडा ६० म्हणजे सुमारे ३७.५ लक्ष खिस्ती मद्रास इलाखा आणि कोचीन व त्रावणकोर ही संस्थाने येथेच आहेत. मद्रास इलाख्याच्या खालसा हद्दीत ख्रिस्त्यांचे प्रमाण शेकडा ३५ इतकेंच आहे. कोचीन संस्थानांत मात्र हे प्रमाण शेकडा २७ आहे; आणि त्रावणकोरमध्ये तर तें शेकडा ३१.५ आहे.* ... १९३५चा कायदा अमलांत येईपर्यंत सिंध हा मुंबई इलाख्याचा भाग म्हणून नांदत होता. हा प्रांत वेगळा तोड्न मागण्याची बुद्धि मुसलमानांत का उद्भवली हे इंग्रजांना चांगले माहीत आहे. सायमन कमिशनच्या अहवालांत या संबंधींची कबुली पुढील स्पष्ट शब्दांत दिलेली आहे : This demand has gathered strength not so much in the homes of the people or among the Mohammedan cultivators of Sind as among leaders of Mohammedan, thought all over India to whom the idea of a Moslem province, contiguous to the predominently Moslem area of Baluchistan, the N. W. F. Province and the Punjab naturally appeals as offering a stronghold against the fear of Hindu domination.†. (ही मागणी बळावली ती सिंधमधील सर्वसामान्य लोकांच्या घरांत अगर तेथील मुसलमान शेतकऱ्यांच्या मनांत बळावली नाही. हिंदुस्थानभर पसरलेल्या मुसलमान पुढाऱ्यांच्या मनांत ही मागणी बळावली. बलुचिस्थान, सीमाप्रांत व पंजाब या मुसलमानांच्या बहुसंख्य वस्तीच्या मुलखालगत सिंध हा मुसलमान प्रांत असावा ही कल्पना त्यांना सहजच रोचक वाटली. हिंदु वर्चस्वाविरुद्ध बळकट आधार, या दृष्टीने त्यांना या कल्पनेचे महत्त्व वाटले.) मुसलमान पुढाऱ्यांना खूष करण्याच्या नादांत ब्रिटिश सरकारने सिंधप्रांत मुंबई इलाख्यापासून वेगळा केला खरा; पण, त्यामुळे अन्याय मात्र कल्पनातीत .. *The Times of India-Indian Year Book, 1935-36, p. 40. +Report of the Indian Statutory Commission, Vol. I, Survey, p. 59. ApnaSancial .