पान:पाकिस्तानचे संकट.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। पाकिस्तानचे संकट पाकिस्तान मागणीचें प्रच्छन्नपणे समर्थन करणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या गृहस्थांना आणखीहि एक प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. ओरिसा, विहार, आसाम वगैरे जे प्रांत अलीकडे स्वायत्त प्रांत म्हणून नांदू लागले आहेत त्यांनीं, अगर कर्नाटक, आंध्रप्रभृति जे प्रांत स्वायत्त व स्वतंत्र होऊ पाहात आहेत त्यांनी अखिल भारतीय मध्यवर्ति सरकारच नको असें कधी म्हटले अगर सुचविलें आहे की काय, हाच तो प्रश्न होय. या प्रांतांनी असे विचार व्यक्त केले असल्याचे जोंवर सिद्ध होत नाही तोवर काँग्रेसच्या अगर हिंदुमहासभेच्या भाषावार प्रांतरचनेचा आधार पाकिस्तानच्या मागणीला पोषक म्हणून घेता येईल, असे वाटत नाही. . कूर्ग, अंदमान-निकोबार बेटे वगैरे किरकोळ भाग हिंदुस्थानचे राजकीय घटक म्हणून हिंदुस्थानांत अंतर्भूत झालेले असले तरी, प्रस्तुत विचाराच्या दृष्टीने ते फारसे महत्त्वाचे नाहीत. पाकिस्तानची मागणी संमत केली गेली अगर हिंदूंची संमति नसतांना सरकारकडून ती मागणी पुरविली गेली तर, हिंदूंना केवढ्या क्षेत्रफळाला मुकावे लागते, या क्षेत्रफळाचें आर्थिक व औद्योगिक महत्त्व काय, हे क्षेत्रफळ हातचे गेल्याने हिंदुस्थानच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर काही परिणाम होतात की काय वगैरे गोष्टींचाच विचार प्रस्तुत असल्यामुळे, अकरा स्वायत्त प्रांत, बलुचिस्थान व संस्थानी हद्दीतला हिदुस्थान एवढ्यासंबधींचाच विचार कर्तव्य आहे... १. मद्रास काही अकरा स्वायत्त प्रांतांपैकी मद्रास इलाखा हा एक महत्त्वाचा प्रांत आहे. १९ व्या शतकाच्या आरंभापासून या प्रांताची जी रचना चालत आली आहे तिच्यांत आजपर्यंत म्हणण्यासारखा फरक झालेला नाही. या इलाख्याचें क्षेत्रफळ १,४२,२७७ चौरस मैल असून १९३१च्या शिरगणतीप्रमाणे त्याची लोकसंख्या ४,६७,४०,१०७ आहे. यांत मुसलमान ३३,०५,९३७ म्हणजे शेकडा ६२ आहेत. या लोकसंख्येत सर्व हिंदूंची एकूणात ३॥ कोटी असून त्यांत दलित हिंदु ६० लक्ष आहेत. या इलाख्यांत ख्रिस्त्यांची लोकसंख्या १५ लक्षांच्या आसपास आहे. हिंदी ख्रिस्त्यांची सगळ्या हिंदुस्थानांतील लोकसंख्या १९२१च्या शिरगणतीप्रमाणे ४५ लक्ष आहे. या लोकसंख्येतली