पान:पाकिस्तानचे संकट.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रांतांची अडाणी मांडणी राहूं नये अशी व्यवस्था हिंदुमहासभेने केली तर तें श्रेयस्कर ठरण्यासारखे आहे. छोटे छोटे प्रांत व त्यांतून निघणारे प्रांतिक अभिमान यांपासून निर्माण होणारा धोका किती जबरदस्त आहे हे ओळखून, योग्य ती व्यवस्था आंखण्याचे हिंदुमहासभा मनांत आणील तर, बॅ० सावरकर यांनी अंदमानच्या अंधेरीतून १९१५ साली व्यक्त केलेले पुढील दूरदर्शीपणाचे विचार तिला मार्गदर्शक ठरतील. ९-३-१९१५ रोजी अंदमानच्या अंधेरीतून लिहिलेल्या वार्षिक पत्रांत बॅ० सावरकर लिहितात : नाला Andhra Sabha is a great and grand movement; but, the question of getting that province separated from the Tamil one is not ennobling..... In this little thing and straw, we see the direction of an ominous wind to come. This is one of the unhealthy reactions of the grand Swadeshi movement and must be corrected before it is too late. The swadeshi, connected in Bengal with the little partition question, brought in this reaction. Every province wants to be separated and shouts and invokes long life to itself. But, how can the province live unless. the nation lives ?* (आंध्र सभेची चळवळ ही एक मोटी उमदी चळवळ आहे. पण आंध्र प्रांत तामीळ प्रांतांतून वेगळा करण्याचा प्रश्न मात्र तसा नाही. या विचार सरणींत में विषबीज दडून बसले आहे तें आज सूक्ष्म दिसत असले तरी, त्यांतूनच उद्यां प्रचंड विषवृक्ष निघण्याची भीति आहे. स्वदेशीचे आंदोलन झालें तें फार उदात्त होते; पण, त्या आंदोलनाची ही एक रोगट प्रतिक्रिया झालेली आहे. तिला वेळीच आळा घातला पाहिजे. बंगालमध्ये स्वदेशी चळवळीची सांगड फाळणीच्या स्थानिक प्रश्नाशी घालण्यात आलेली होती आणि त्यामुळे ही प्रतिक्रिया निर्माण झाली. प्रत्येक प्रांत विभक्त होण्याची इच्छा धरीत आहे आणि आपल्यालाच दीर्घायष्य लाभावें असें जोरजोराने प्रार्थीत आहे. पण, राष्ट्र जगल्याविना प्रांत जगणार कसा?) - काँग्रेसने मान्य केलेल्या भाषावार प्रांतरचनेवर आक्षेप घेऊन मुसलमानांच्या

*An Echo from the Andamans, p. 36.