पान:पाकिस्तानचे संकट.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०. पाकिस्तानचे संकट रचना करतांना भाषावारीचे तत्त्व मान्य व्हावें असेंहि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने मुंबईस मे १९२७मध्ये ठरविले. पण, राज्यकारभारांत; प्रांतविभागणीचे हे एकच एक तत्त्व काँग्रेस मान्य करील असें म्हणता येणार नाही. काँग्रेसची प्रांतरचना राज्यकारभाराच्याहि दृष्टीने मान्य करण्यांत आलेली आहे असे गृहीत धरले तर, त्यांतून असा निष्कर्ष निघेल की, राज्यकारभाराच्या सोईसाठी मुंबईशहर पृथक् समजण्यात यावे, या गोष्टीलाहि काँग्रेसची मान्यता मिळालेलीच आहे ! - इतर महत्त्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून, केवळ भाषावारीच्या तत्त्वावर प्रांतांची विभागणी करणे हे किती अनर्थावह आहे याचे मार्मिक विवेचन डॉ० आंबेडकर यांनी केलेले आहे. ते म्हणतात : _In this distribution, there is no attention paid to. considerations of area, population or revenue. The thought that every administrative unit must be capable of supporting and supplying a minimum standard of civilized life for which it must have sufficient area, sufficient population and sufficient revenue has no place in this scheme of distribution of areas for provincial purposes.* .. . (या विभागणीत क्षेत्रफळ, लोकसंख्या व उत्पन्न या मुद्यांकड़े लक्षच देण्यात आलेले नाही. राज्यकारभारासाठी जो विभाग कल्पावयाचाः तो विभाग कांहीं एका किमान प्रमाणांत आधुनिक सुखसोयींनी सजलेलें जीवन नागरिकांना पुरवं शकेल असा असला पाहिजे, हा विचार महत्त्वाचा आहे. यासाठी अशा विभागांत पुरेशी लोकसंख्या असली पाहिजे, त्याचे क्षेत्रफळ पुरेसे असले पाहिजे, आणि त्यांतून पुरेसे उत्पन्नहि उभे करता आले पाहिजे. काँग्रेसच्या प्रांतविभागणींत या गोष्टींना स्थानच मिळालेलें नाही.) पुष्कळशा बाबतींत हिंदुमहासभेकडून काँग्रेसचे अनुकरण केले जातें व त्यामुळे हिंदुमहासभेच्या घटनेंतहि भाषावार प्रांतरचना मान्य करण्यांत आलेली आहे. डॉ. आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भाषावार प्रांतरचनेमुळे जो कोटिक्रम रचिला आहे तो निर्दोष नसला तरी, अशा कोटिक्रमाला जागान *Thoughts on Pakistan, pp. 21-22. . ...