पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ सोन्याचे वासरूं. प्रक० ३६ ओतीव वासरूं करून त्याला कोरणीने कोरिले; आणि त्यांनी मटलें: "हे इस्राएला, तुझ्या ज्या देवांनी तुला मिसर देशांतून आणले ते हेच!" हे पाहून अहरोनाने वेदी बांधली आणि असे सांगितले की: "उद्या परमेश्व- राचा सण आहे!" मग सकाळी त्यांनी उठून होम केले आणि शांत्यर्पणे आणून वाहिली. तेव्हां लोक खाण्यास बसले व प्याल्यावर खेळण्यास उठले. आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले की: "चल, उतर, कांकी तुझ्या ज्या लोकांस त्वा मिसर देशांतून आणले त्यांनी दुष्टाई केली आहे. जो मार्ग म्या त्यांस सांगितला त्यांतून ते लवकर वळले आहेत. हे ताठर मानेचे लोक आहेत. तर मला असू दे, मणजे त्यांवर माझा राग तापून मी त्यांचा क्षय करीन, मग तुला मोठे राष्ट्र असे करीन.” तेव्हां मोश्याने परमेश्वरासमोर विनंती करून मटले: “हे परमेश्वरा, तुझ्या ज्या लोकांस त्वा मोठ्या बळाने व पराक्रमी हाताने मिसर देशांतून काढले, त्यांवर तुझा राग कां संतापला? मिसऱ्यांनी कां ह्मणावे की, त्याने त्यांस डोंगरांमध्ये जिवे मारून भूमीच्या पाठीवरून त्यांचा नाश करायास त्यांस काढले आहे? तूं आपल्या रागाचा संताप सोड आणि आपले सेवक अब्रा- हाम, इझाक व इस्राएल यांची अठवण कर की, त्या आपण त्यांसी शपथ वाहून झटले मी तुमच्या संतानांला आकाशांतील ताऱ्यासारखे वाढवीन, आणि हा अवघा देश त्यांला देईन आणि तो सर्वकाळ त्यांचे वतन होईल." तेव्हां परमेश्वराने आपल्या लोकांचे जे वाईट करावे ह्मणून मटले त्या- विषयीं पश्चात्ताप केला *). _*) सोन्याचे वासरूं (नंदी) करण्याकडून, कोरीव मूर्ति करूं नको दाणून जी दुस- री आज्ञा, तिजविरुद्ध लोकांनी पाप केले. बैल हा शक्तीची उपमा आहे असे वाटन सोन्याचे वासरूं ही यहोवाची प्रत्यक्ष प्रतिमा (मर्ति) असावी असे त्या लोकांस भासले. सोन्याचे वासरू करण्याकरितां या लोकांच्या बायकांचे डागिणे मागितले असता, ते डा- गिणे देणार नाहीत, आणि त्यांनी डागिणे न दिले म्हणजे अर्थातच त्यांचे दुराग्रहा, मा. गणेही बंद होईल, ही युक्ती अहरोनाने योजली होती खरी, परंतु या अल्पबुद्धीच्या यो- जनकडून त्याचा उद्देश सिद्धीस न जाता तो पाशात पडला.- मोशे जाणत होता की लोकांसाठी मध्यस्थी करणे हे आपणाकडे आहे. यासाठीच परमेश्वराने ऐकिलें तोपर्यंत लोकांकरिता मध्यस्थी करणे त्याने सोडले नाही, आणि या गोष्टीविषयीं देवानेही त्याची परीक्षा केली व तो परीक्षेस उतरला.