पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ३६] सोन्याचे वासरूं. खर ऐक्य होते. पवित्र देव भशुद्ध लोकांसी नव्हे तर केवळ शुद्ध केलेल्या लोकांबरो- वर करार करू शकतो, यामुळे करार होण्यापूर्वी शुद्धीसाठीं यज्ञ करण्याचे अगन्य होते. __२. त्यानंतर मोशे व अहरोन, नादाब व अबीहू व इस्राएलाचे सत्तर वडी- ल चढले. आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले ; त्याच्या पायाखा- लीं नीलकांत चिरेबंदी कामासारखें शुद्धतेने आकाशाच्या सत्वासारखें होते. आणि त्यांनी देवाला पाहिले तरी ते खाल्ले व प्याले *). आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले: “तू डोंगरावर मजपासीं चढ व तेथे ऐस, मग त्यांस शिकवायास ज्या दगडी पाट्या, नियम व आज्ञा म्या लिहिल्या त्या देईन." तेव्हां मोशे आपल्या यहोशवा सेवकासंगती देवाच्या डोंगरावर चढला आणि त्याने वडिलांस सांगितले की: "आह्मी माघारे येऊं तो- पर्यंत एथे राहा.” मोशे तर डोंगरावर चढला आणि ढगाने डोंगर झांकला आणि परमेश्वराचे तेज सीना डोंगरावर राहिले आणि जळत अग्नीसारखे डोंगराच्या माथ्यावर दिसले. आणि मोशे ढगांत जाऊन चाळीस दिवस व चाळीस रात्री डोगरावर होता. आणि परमेश्वराने मोश्यासी बोलणे समाप्त केल्यावर त्याला संकेतलेखाच्या दोन पाच्या दि- ल्या त्या दगडी पाच्या देवाच्या बोटाने लिहिलेल्या होत्या * ).

  • ) हे सत्तर वडील लोकांचे प्रतिनिधि होते. जे त्यांनी खाझे न प्यालें तें होमा-

चे जेवण होते. होमाच्या योगाने यज्ञकर्ता शुद्ध होउन देवासों समेट पावतो आणि देव त्याला आपल्या संगतीत घेतो, हे यज्ञभोजनावरून दिसन येते. कारण की येणे- करून यज्ञकर्ता देयाचा मित्र जणू त्याचा साथी असा होतो. प्रक० ३६. सोन्याचे वासरूं. (निर्ग० ३३ व ३४.) १. आणि लोकांनी पाहिले की, मोश्याला डोगरावरून उतरायास उशीर लागला, तेव्हां ते अहरोनाला ह्मणालेः "उठ, आमच्या पुढे चा- लतील असे देव आह्मासाठी कर, कांतर ज्या माणसाने आह्मास मिसर देशांतून आणले त्या मोश्याला काय झाले हे आह्मास ठाऊक नाही." तेव्हां अहरोनाने त्यांस सांगितले की: “जी सोन्याची कुंडले तुमच्या नायकांच्या, तुमच्या पुत्रांच्या व तुमच्या कन्यांच्या कानांत आहेत ती का मजकडे आणा." मग सर्व लोकांनी आपल्या कानांतील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली, ती त्याने घेऊन त्याचे