पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५ प्रक० ३६] सोन्याचे वासरूं. २. मग मोशे डोंगरावरून उतरला. आणि संकेतलेखाच्या दोन पाया त्याच्या हातांत होत्या, आणि लिहिणे हे देवाचे लिहिणे पायांवर कोरलेले असे होते. आणि मोशे छावणीजवळ आल्यावर आणि वासरूं व ताफे पाहिल्यावर त्याचा राग तापला, आणि डोगराखाली त्याने आपल्या हातां- तून पाट्या टाकून या फोडल्या, आणि वासरूं घेऊन त्याने अग्नीत जा- ळिले व वाटून चूर्ण केले. मग पाण्यावर विखरिलें व इस्राएलाच्या संता- नांस पाजिलें. नंतर मोशे छावणीच्या दारांत उभा राहून बोललाः "परमेश्वराच्या पक्षाचा कोण? तो मजकडे येवो?" तेव्हां लेवीच्या वंशांतील सर्व मनुष्य त्याकडे मिळाले. त्यांस त्याने सांगितले : "परमे- श्वर असे सांगतो की तुह्मी प्रत्येक आपली तरवार कंबरेस बांधा, आणि छावणीत फिरत जाऊन परमेश्वराविरुद्ध जे आपले भाऊ, आपले मित्र व आपले शेजारी असतील त्यांस जीवे मारा" * ).. मग लेवीच्या वंशाने मोश्याच्या सांगण्याप्रमाणे केले आणि त्याच दिवसीं लोकांतील सुमारे ३००० माणसे पडली. आणि दुसऱ्या दिवसीं मोश्याने लोकांस मटले : "तुह्मी मोठे पाप केले आहे! तथापि मी आतां परमेश्वराजवळ वर जातो, कदा- चित तुमच्या पापाविषयी प्रायश्चित्त करीन.” मग मोशे परमेश्वराज- वळ परत जाऊन ह्मणालाः "अरेरे! या लोकांनी आति मोठे पाप केले आहे; तथापि अवश्य त्यांच्या पापाची क्षमा कर! परंतु जर न करसील तर तुझ्या पुस्तकांतून माझे नांव खोड." परमेश्वर ह्मणाला : “ज्या कोणी मजसीं पाप केले त्याला मी आपल्या पुस्तकांतून खोडीन आणि ज्या दिवसीं मी झडती घेतो त्यांत त्यांच्या पापाचे शासन त्यांवर घालीन."

  • ) परमेश्वराकडे परत वळायास ज्यांची इच्छा असेल त्यांच्या अपराधाचे मोचन होण्या-

करिता मोश्याने त्यांस हाका मारून झटले: “परमेश्वराच्या पक्षाचा कोण? नो मतको येवो.” परंतु जे कोणों गजूनही ताठर मानेचे असून फितुरांत राहिले ते फितुरी व राज- द्रोही असल्यामुळे त्यांस केवळ देहांत शिक्षा योग्यच होती. ३. परमेश्वराने मोश्याला सांगितले की: "तूं ताठर मानेचे लोक, यास्तव म्या तुझ्यामध्ये जाऊं नये, गेलो तर वाटेवर मी तुझा क्षय करीन. मी तझ्या पुढे दूत पाठवून खनानी यांस घालवीन." तेव्हां लोक ही वाईट गोष्ट ऐकन कष्टी झाले आणि त्यांतील कोणी आपले डागिणे आंगावर घातले नाहीत. मग मोश्याने मंडप (त्या वेळचे पवित्र स्थान पर