पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आज्ञा देणे. (प्रक० ३४ करण्याचा शब्द वाढून फार मोठा झाला. तेव्हां मोशे बोलला आणि देवाने शब्देंकरून त्याला उत्तर दिले, ३. देवाने ही सर्व वचने सांगितलीं की: “ज्याने तुला मिसर देशां- तून दासांच्या घरांतून काढले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्या समोर तुला दुसरे देव नसोत. तूं आपणासाठी कोरीव मूर्ति करूं नको, आणि जे वरती आकाशांत अथवा जे खालतीं पृथ्वीत अथवा जे पृथ्वीच्या खालती पाण्यांत आहे त्याची प्रतिमा करूं नको, त्याच्या पाया पडूं नको आणि त्याची सेवा करू नको; कांकी मी परमेश्वर तुझा देव आवेशी देव आहे जे माझा द्वेष करतात त्यांच्या तिसऱ्या व चवथ्या पिढीपर्यंत बापाच्या अन्यायामुळे लेकरांचे शासन करतो, आणि जे मजवर प्रीति करतात व माझ्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारांवर मी दया करतो.-परमेश्वर तुझा देव याचें नाम व्यर्थ घेऊ नको, कांकी जो त्याचें नाम व्यर्थ घेतो त्याला परमेश्वर निर्दोष मानणार नाहीं.--शाब्बाथ दिवस पवित्र पाळावा ह्मणून त्याची अठवण कर. सहा दिवस उद्योग करून आपले सर्व काम कर. पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा विसाव्याचा दिवस आहे, त्यांत कांहीं काम करूं नको; तूं व तुझा पुत्र व तुझी कन्या व तुझा दास व तुझी दासी व तुझा पशु व तुझ्या दारांतील तुझा विदेशी यानेही करूं नये : कांकी परमेश्वराने सहा दिवसांत आकाश व पृथ्वी व समुद्र ही व यांतील अवघीं उत्पन्न केली, आणि सातव्या दिवसीं तो स्वस्थ राहिला. यास्तव परमेश्वराने शाब्बाथ दिवसाला आशीवाद देऊन तो पवित्र ठर- विला.-परमेश्वर तुझा देव जो देश तुला देतो त्यांत तुझें आयुष्य दीर्घ व्हावे ह्मणून आपला बाप व आपली आई यांचा सन्मान कर.हत्या करूं नको.-व्यभिचार करूं नको.-चोरी करूं नको.-आपल्या शेजा-याविषयी खोटी साक्ष देऊ नको. आपल्या शेजाऱ्याच्या घरावर लोभ ठेवू नको; आपल्या शेजाऱ्याची बायको अथवा त्याचा दास, अथवा त्याची दासी, अथवा त्याचा बैल, अथवा त्याचे गाढव, अथवा आपल्या शेजाऱ्याचे जे काही असेल त्याजवर लोभ ठेवू नको *).

  • ) या दाहा आज्ञा संपूर्ण नियमशास्त्राचा सारांश आणि त्याचा पाया आहेत.

गर्जना व विजांचा कडकडाट होउन परमेश्वराने त्या सर्व लोकांसमक्ष उमारून सांगितल्या. त्यानंतर त्याने त्या आज्ञा इस्राएलांस निरंतर साक्ष होण्याकरिता दोन