पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक०३४] आज्ञा देणे. श्वराने मटले: “याकोबाच्या घराण्यासी असे सांग की, जे म्या मिस- यांला केले ते, आणि म्या तुह्मास गरुडांच्या पंखांवर उचलून घेऊन माझ्याजवळ आणले है तुह्मी पाहिले आहे. ह्मणून तुझी माझे बोलणे काल आणि माझा करार पाळाल, तर तमी सगळ्या लोकांपेक्षां माझे खासगीचे व्हाल; सर्व पृथ्वी तर माझी आहे, आणि तुह्मी याजकांचे राज्य व पवित्र राष्ट्र असे मला व्हाल" * ). मग मोश्याने लोकांच्या वडिलांस बोलाविले आणि त्या सर्व गोष्टी त्यांच्यापुढे ठेविल्या. तेव्हां सर्व लोकांनी एक मताने असे उत्तर दिले की: “परमेश्वराची प्रत्येक गोष्ट आह्मी पाळू."

  • ) या वाक्यांत इस्राएल लोकांस बोलविणे, आणि जन्या कराराचा अर्थ स्पष्ट करून

दाखविणे आहे. इस्राएल लोक दुसऱ्या सर्व लोकांहून देवाचे खासगीचे लोक असावे; जसें परमेश्वराने दुसऱ्या ठिकाणांत (निर्ग०१.२२) सांगितले तसें, झणजे "इस्लाएल माझा ज्येष्ठ पुत्र आहे;" ह्मणजे दुसन्या राष्ट्रांपासून प्रथम निवडलेला आणि देवाने दत्त करून घेतलेला असा आहे. ज्येष्ठ पुत्राचा पुरोहितपणा आहे, हाणन 'इस्राएल याजकांचे राज्य व्हावे, झणजे त्यांकडून सर्वराष्ट्रांस देवाचे प्रगटविणे प्राप्त व्हावे, न्यांनी ते राखावे आणि त्याचा संभाळ करावा. इस्राएलास यासाठीच वोलावणे अस- व्यामुळे ते पवित्र राष्ट आहे, कारण जें पवित्र ते दुसऱ्या साधारणापासून वेगळे केले. लें आणि देवाच्या कार्यासाठी नेमलेलें असें आहे.- इस्राएलाची राज्यव्यवस्था देवाधीन होती. देव स्वतः त्यांचा राजा व्हायास इच्छितो. जसा कोणी राजा आपल्या प्रजेमध्ये राहुन तिजवर राज्य करितो, त्याचप्रमाणे देव इस्राएलावर राज्य करण्या- करिता त्यामध्ये उतरण्यास प्रवृत्त होतो. । २. आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले: "लोकांकडे जा आणि आज व उद्या त्यांस शुद्ध कर ; आणि त्यांनी आपली वस्त्रे धुवावी आणि तिसऱ्या दिवसासाठी ते तयार होवोत. डोंगराचहुंकडे शीव नेमून दे, कारण की कोणी डोंगराला शिवल्यास मरेल पशु असो माणूस असो." मग तिस-या दिवसी (मिसरांतून निघाल्या पासून बहुतकरून पन्नासाव्या दिवसी) गर्जना व विजा व डोंगरावर भारी ढग आणि करण्याचा फार मोठा शब्द ही झाली, मग तळांतले सर्व लोक कांपले, तेव्हां देवाच्या अटीसाठी मोश्याने लोकांस तळांतून बाहेर आणले, आणि ते डोंगरा- खाली उभे राहिले, सीना डोगर तर अगदी धूममय झाला, कांकी पर- मेश्वर अमीने त्याजवर उतरला, अवघा डोगरही फार कांपला. आणि