पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ आज्ञा देणे, प्रक० ३४ दुप्पट गोळा केले. तेव्हां मोशे यांस बोललाः"जे तुह्माला भाजायाचे ते भाजा व जे शिजवायाचे ते शिजवा, आणि जे उरले ते सकाळपर्यंत आपल्याजवळ ठेवा; आणि त्याची घाण आली नाही व त्यांत किडा झाला नाही. तेव्हां मोश्याने सांगितले की: "आज परमेश्वराचा शाब्बाथ आहे, आज रानांत तुह्मास मिळणार नाही.” तथापि लोकांतील कोणी गोळा करायास बाहेर गेले, परंतु त्यांस कांही मिळाले नाही. मग मो- श्याने अहरोनाला सांगितले: “एक पात्र घेऊन त्यांत माना घालन तुमच्या पिढ्यानपिढी राखायास पवित्र स्थानांत ठेव." ३. आणि इस्राएलाच्या समुदायाने सीन रानांतून निघून रफीदी- मांत तळ दिला आणि तेथे लोकांस प्यायाला पाणी नव्हते, ह्मणून लोक मोश्यासी भांडून ह्मणाले: “आमास पाणी प्यायास द्या!" तेव्हां मोश्याने परमेश्वराचा धावा केला, आणि परमेश्वराने सांगितले : "आपल्या ज्या काठीने खा नदीला मारले ती आपल्या हातांत घेऊन जा, पाहा, मी तेथे तुजपूढे होरेबांत खडकावर उभा राहतो आणि तूं खडकाला मार, ह्मणजे त्यांतून पाणी निघेल मग लोक पितील.” मोश्याने तसे केले, आणि इस्राएलाच्या भांडण्यावरून व त्यांनी परमेश्वराची परीक्षा केली यावरून त्याने त्या ठिकाणाचे नांव मस्सा व मरिबा ठेवले. त्यानंतर अमालेकांनी येऊन इस्राएलासी रफीदीमांत लढाई केली. तेव्हां यहो- शवा अमालेकांसी लढला. परंतु मोशे व अहरोन व हूर डोंगराच्या शिख- रावर चढले. आणि जेव्हां मोशे आपले हात (प्रार्थना करितांना। वर करी, तेव्हां इस्राएल बळावे, पण तो आपला हात खाली करी, तेव्हां अमालेक बळावे. मोश्याचे हात तर थकले, यास्तव अहरोन व हर इकडे एक व तिकडे एक असे राहून त्यांनी त्याच्या हातांस टेका दिला. तसे यहोशवाने अमालेकांचा मोड केला. प्रक० ३४. आज्ञा देणे. (निर्ग० १९ व २०). २. इस्राएलाची संतानें मिसर देशांतून आल्यावर तिसऱ्या महिन्यांत ती सीना नामक रानांत आली, आणि तेथे देवाच्या डोंगरापुढे तळ देऊन राहिली. तेव्हां मोशे देवाजवळ डोंगरावर चढला आणि परमे-