पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ३३] इस्राएलांचा सीना डोंगरापर्यंत प्रवास. ७७ प्रक० 33. इस्राएलांचा सीना डोंगरापर्यंत प्रवास. (निर्ग० १५-१७). १. मोश्याने इस्राएलास सुफसमुद्रापासून नेले, तेव्हां ते तीन दिवस रानांत चालले आणि त्यांस पाणी मिळाले नाही. मग ते माऱ्यास आले, परंतु मान्यांतील पाणी कडू होते यामुळे ते त्यांच्याने पिववेना. तेव्हां लोकांनी मोश्यावर कुरकुर केली; आणि त्याने परमेश्वराचा धावा केला आ- णि परमेश्वराने त्याला झाड दाखविले, ते त्याने पाण्यात टाकले मग पाणी गोड झाले. त्यानंतर ते सीन रानांत आले. तेथें इस्राएलाची संताने कुरकुर करीत ह्मणूं लागली की "मिसर देशांत मांसाच्या भांड्यांजवळ बसून तृप्ती होईपर्यंत आमी अन्न खाले, तेथे आमाला मरण आले अस- ते तर बरे. तुझी तर आमास भुकेने मारावे ह्मणून या रानांत आणले आहे." तेव्हां परमेश्वर मोश्याला बोलला : “म्या इस्राएलाच्या संतानां- च्या कुरकुरी ऐकिल्या आहेत, तर त्यांस सांग, संध्याकाळी तुह्मी मांस खाल व सकाळी भाकर खाऊन तृप्त व्हाल, आणि तुह्मास समजेल की मी परमेश्वर तुमचा देव आहे." नंतर संध्याकाळी लावे वरती आले आणि त्यांनी तळ झांकला. २. आणि सकाळी तळाच्या चहुंकडे दहिंवर पसरलेले होते, मग दहिवराचा पसारा अटून गेल्यावर पाहा, रानाच्या पाठीवर बारीक पांढ- री भुकटी थिजलेल्या दहिवराप्रमाणे बारीक असी भूमीवर होती, आणि याची चव मध घातलेल्या पोळी सारखी होती. आणि इस्राएलाच्या संतानांनी त्याचे नांव माना ठेवले. मोशे तर बोललाः "जे अन्न परमेश्वराने आकाशांतून तुह्मास खायास दिले ते हेच. तुह्मी प्रत्येक आपल्या खाण्या- .च्या नेमाप्रामाणे त्यांतून गोळा करा." आणि कोणी फार कोणी थोडे असे गोळा केले. मग त्यांनी मापाने मोजून घेतले. तेव्हां ब्याने फार आणले त्याला अधिक झाले नाही, आणि ज्याने थोडे आणले त्याला उणे झाले नाही. तर प्रत्येकाला आपापल्या खाण्याच्या नेमाप्रमाणे झाले. आणि मोश्याने सांगितले की: "कोणी त्यांतील कांहीं सकाळपर्यंत ठेवू नये; तरी कित्येकांनी त्यांतील ठेवले तेव्हां त्याला किडे पडले व त्याची घाण आली. आणि सहाव्या दिवसी त्यांनी