पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ वल्हांडण आणि मिसरांतून निघणे. प्रक० ३२ आणि जे तुमचे तारण परमेश्वर आज करणार ते पाहा. परमेश्वर तुह्मा- साठी लढाई करील, आणि तुह्मी उगेच राहाल.” तेव्हां देवाचा जो दूत इस्राएलापुढे चालत होता तो निघून त्यांच्या मागें चालला, ह्मणजे मिसऱ्यांचा गोट व इस्राएलाचा गोट यांच्या मध्ये तो आला, आणि ति- कडे ढगाचा काळोख होता परंतु इकडे रात्री उजेड करीत होता; आणि एक गोट दुसऱ्या गोटाजवळ रात्रभर आला नाही. ___५. मग मोश्याने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपला हात समुद्रावर लांब केला, तेव्हां परमेश्वराने बळकट पूर्वेच्या वाऱ्याकडून समुद्र. रात्रभर सारून सारून कोरडा केला व पाणी दुभागले. मग इस्राएलाची संताने समुद्राच्या मधून कोरड्या भूमीवरून चालली, आणि त्यांच्या उजवीकडे व डावीकडे पाणी त्यांस भिंत असे झाले. आणि परमेश्वराने मिसऱ्यांचे मन कठोर केले, तेव्हां ते पाठीस लागून घोडे व रथ व त्यांचे स्वार त्यां- च्या मागे समुद्राच्या मध्यभागी आले. आणि पाहाटेच्या प्रहरी अग्नीच्या व ढगाच्या खांबांतून परमेश्वराने मिसऱ्यांच्या गोटाकडे पाहिले आणि मिसरी गोटास घाबरे केले, तेव्हां मिसरी ह्मणाले : "आपण पळू, कां- की परमेश्वर इस्राएलासाठी लढत आहे." तेव्हां परमेश्वराने मोश्याला सांगितले की : "तूं आपला हात समुद्रावर लांब कर!" मग मोश्याने तसे केले आणि समुद्रांतले पाणी परत येऊन त्यांत फारो आपल्या सर्व सैन्यासुद्धां बुडाला, त्यांतील एकही राहिला नाही. तसे त्या दिवसी परमे- श्वराने इस्राएलांस मिसऱ्यांच्या हातांतून सोडविले. तेव्हां मोशे व इसा- एलाची संताने परमेश्वराला हे गीत गाऊन ह्मणाली: “परमेश्वराला मी गाईन, कांतर तो थोरच थोर आहे. परमेश्वर रणवीर, त्याचे नाम यहोवा, त्याने फारोचे रथ व त्याचे सैन्य समुद्रांत टाकले. लोक ऐकून कांपतील, अदोमाचे मुख्य विस्मित होतील ; मवाबी बलाढ्यांस कंप सुटेल; खनानां- तील सर्व राहणारे विरून जातील.” आणि मिर्याम भविष्यवादीण अहरो- नाची बहीण इने आपल्या हाती डफ घेतला आणि इच्यामागे सर्व बायका डफ घेऊन ताफ्यांनी बाहेर आल्या, आणि मिर्यामीने त्यांस असे उत्तर केले : “परमेश्वराला गा, कांकी तो थोरच थोर आहे, त्याने घोडे व त्यांवर- चे स्वार समुद्रांत टाकले आहेत."