पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ३२] वल्हांडण आणि मिसरांतून निघणे. असे घर नव्हते. आणि फारोने रात्री मोशे व अहरोन यांस बोलावून मटले: “उठा, माझ्या लोकांमधून निघा. परमेश्वराची सेवा करा. तुमची मेंढरे आणि गुरे घेऊन जा, आणि मलाही आशीर्वाद द्या." तेव्हां लोकांस देशांतून लवकर चालवावे ह्मणून मिसऱ्यांनी त्यांवर निकड लावली: कारण ते ह्मणाले : “आह्मी सर्व मेलो." आणि मोश्याने सांगितले तसे लोकांनी केले, ह्मणजे मिसऱ्यांजवळ रुप्याचे व सोन्याचे डागिणे व वस्त्रे मागि- तली, आणि परमेश्वराने लोकांवर मिसन्यांच्या मनांत कृपा घातली आणि यांनी त्यांला मागितल्याप्रमाणे दिले *). _*) जें मिसरी लोकांनी इस्राएल लोकांच्या मागण्याप्रमाणे दिले, ते त्यांच्या विगार कामाबद्दल योग्य प्रतिफल असे झाले, ३. तसे इस्राएलाची संताने निघून गेली. बालकां खेरीज सुमारे सहा लाख पुरुष पायी चालणारे होते. अणखी परक्यांचा समुदाय (मिसर देशांतील कनिष्ट जातीच्या लोकांपैकी) त्यांसंगतीं चालला आणि मेंढरे व गुरे असे धन फार होते. इस्राएलाची संताने मिसरांत राहत होती तो काळ ४३० वर्षे होता. निघते वेळेस मोश्याने आपल्यासंगतीं योसे- फाची हाडे ही नेली. आणि पलिष्टी देशाकडली वाट जवळ असतांही देवाने लोकांस त्या वाटेने नेलें नाहीं, कांकी देवाने मटले: हे लोक लढाई पाहिल्यावर पश्चात्ताप करून मिसराकडे माघारें फिरतील, यास्तव देवाने त्यांस मुफसमुद्र (सुएझचे आखात) याकडच्या रानांतल्या वाटेने नेले. आणि त्यांस वाटेने नेण्यासाठी परमेश्वर दिवसा ढगाच्या खांबांत व रात्री त्यांस उजेड करायास अगीच्या खांबांत त्यांच्या पुढे चालला. ४. आणि लोक पळाले आहेत असे वर्तमान मिसरी राजाला आले, तेव्हां फारोचे मन फिरले आणि तो ह्मणाला : “इस्राएलास आमची चाकरी करण्यापासून जाऊ दिले हे आमी काय केले, परंतु पाहा, ते देशांत घोटाळले, रानाने ते कोंडलेले आहेत.” मग याने ६०० रथ, घोडे व त्यांचे स्वार घेऊन त्यांच्या पाठीस लागला. आणि लोक समुद्रा- जवळ तळ देऊन उतरले असता त्यांनी त्यांस तेथेच आटोपले. हे पा- हना इस्राएलाच्या संतानांनी फार घाबरे होऊन मोश्याला सांगितले की: "मिसरांत प्रेतस्थळे नव्हतीं ह्मणून त्वा आमास रानांत मरण्यासाठी आणलें काय? खा आमचे काय केले? मोशे ह्मणाला : “भिऊ नका. उमेर