पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ३२] वल्हांडण आणि मिसरांतून निघणे. ७३ ९. त्यानंतर मोश्याने आपला हात आकाशाकडे लांब केला, आणि नि- बिड काळोख सर्व मिसर देशांत तीन दिवस झाला, कोणी कोणाला दिसला नाही आणि कोणी आपल्या ठिकाणांतून उठला नाही; तरी सर्व इस्राएल लोकांस आपल्या वस्तीत उजड होता. मग फारोने मो- श्याला बोलावून सांगितले: “तुह्मी आपल्या बालकांसुद्धा देखील जा, तु- मचे कळप मात्र एथे ठेवा.” पण मोशे ह्मणालाः “आमचे पशूही आमच्या संगतीं जायाचे आहेत, यज्ञ व होम करायास त्यांची आमाला गरज आहे." तेव्हां परमेश्वराने फारोचे मन कठोर केले, आणि तो मो- श्याला ह्मणाला: “मजपासून जा, आपणाला संभाळ, माझे तोड फिरून पाहं नको, नाही तर त्याच दिवसीं मरसील." तेव्हां मोशे ह्मणाला: "बरें बोललास, मी आतांपासून तुझे तोंड फिरून पाहणार नाही." १०. आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले की: “अणखी एक पी- डा आणितो, त्यानंतर तो तुह्मास एथून जाऊं देईल. मध्य रात्रीच्या समारांत मी मिसरामध्ये फिरेन आणि फारो याच्या ज्येष्ठ पुत्रापासून दासी तिच्या ज्येष्ठ पुत्रापर्यंत, प्रत्येक ज्येष्ठ पुत्र आणि पशूतील प्रत्येक प्रथम वत्स गोल, परंतु इस्राएलाचे सर्व लोक यांवर कुत्रे जीभ हालवून भोकणार नाही, यावरून तुमाला समजेल की मिसरी व इस्राएल यांमध्ये परमेश्वर भेद करतो, तेव्हां ते येऊन ह्मणतील: "तुझ्या हाताखालच्या सर्व लोकां- सुद्धां निघून जा!" अचना. फारोने देवाचा बोध व शिक्षा न मानून सर्वदां आपले मन कठोर करून घेतले, ह्मणून देवानेही शासनार्थ त्याचे मन कठोर केलें. फारोला आशीर्वाद नको होता तर शाप, यास्तव देवाने त्याच्या इच्छे- प्रमाणेच होऊ दिले. परमेश्वराची आज्ञा मानण्याकडून फारोने त्याचा सन्मान केला नाही, ह्मणून देवाने फारोचा नाश करून आपला महिमा राखिला आहे. प्रक० 32. वल्हांडण आणि मिसरांतून निघणे. (निर्ग० १२-१५). आणि परमेश्वराने मोश्याला व अहरोनाला सांगितले की: "ह्या अबीब महिन्याच्या दशमीस प्रत्येक घरधन्याने आपल्या जवळ निर्दोष 101