पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिसन्यांवरील अरिष्टे. प्रक० ३१ आणि ते मरतील.” तेव्हां फारोच्या दासांतील जो परमेश्वराच्या गोष्टी- ला भीत होता, त्याने आपले दास व पशू घरी पळवून आणले. आणि रानांतील सर्व मनुष्य व पशू गारांनी मेले, आणि सर्व हिरवळ गारांनी मारि- ली आणि अवघी झाडे मोडली. केवळ गोशेन प्रांतांत गारांची वृष्टी झाली नाही. मग फारोने पाठवून मोशे व अहरोन यांस बोलावून झटले: "या वेळेस म्या अपराध केला आहे; परमेश्वर नीतिमान् आणि मी व माझे लोक अपराधी आहो. परमेश्वराची प्रार्थना करा की, देवाच्या गर्जना व गारांची वृष्टी आणखी होऊं नये, ह्मणजे मी तुह्मास जाऊं देईन.” आणि मोश्याने विनंती केल्यावर गर्जना खुंटल्या आणि गारा व पाऊस भूमीवर आणखी पडला नाही. परंतु फारोने आणखी पाप करून आपले मन कठोर केले. ८. आणि मोशे फारोकडे जाऊन त्याला ह्मणाला : “माझ्या लोकांस जाऊ देण्यास आणखी अनमान करसील, तर या दिवसापर्यंत कोणी पाहिले नाहीत असे मी तुझ्या देशांत टोळ आणवीन." तेव्हां फारोचे दास त्याला ह्मणाले: “त्या लोकांस तरी जाऊ दे, मिसरांचा नाश झाला. है तूं अद्याप जाणत नाहींस काय?" तेव्हां फारो मोश्याला ह्मणालाः "तुह्मी जे प्रौढ (पुरुष लोक) आहां, ते तुह्मी जाऊन परमेश्वराची सेवा करा.” मोशे ह्मणालाः “आह्मी आबालवृद्ध जाऊं, आमच्या पुत्र कन्यां- सुद्धां आमची मेंढरे व आमची गुरे घेऊन जाऊं.” तेव्हां त्यांस फारोच्या समोरून घालविले. नंतर सकाळ झाल्यावर पूर्वेच्या वा-याने टोळ आ- णले, त्यांनी सर्व भूमीची पाठ झांकली व भूमीवर आंधार पडला, आणि त्यांनी भूमीवरची सर्व हिरवळ खाल्ली आणि सर्व मिसर देशांत कांहींच हिरवे राहिले नाही, आणि फारोची घरे व सर्व मिसयांची घरे टोळांनी भरून गेली. तेव्हां फारोने उतावळी करून मोश्याला व अहरोनाला बोलावून मटले: “आतां ही एकच वेळ माझें पाप क्षमा करा, आणि है मरण मात्र मजपासून दूर करावे असी तुह्मी आपला देव परमेश्वर याजवळ विनंती करा.” तेव्हां मोश्याने विनंती केली आणि फार बळकट पश्चिम- च्या वाऱ्याने टोळ उडवून सूफसमुद्रांत घातले. पण परमेश्वराने फारो- चें मन कठोर केले आणि त्याने इस्राएलाच्या लोकांस जाऊ दिले नाहीं.