पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७१ ३१ मिसऱ्यांवरील अरिष्टे. करावे. ह्मणजे मी लोकांस जाऊं देईन.” तेव्हां मोश्याने परमेश्वराचा धावा केला, आणि पाहा, जे बेडूक होते ते एकाच सकाळी सर्व मेले, आणि देशांत घाण सुटली. परंतु फारोने पाहिले की आराम झाला, यास्तव त्याने आपले मन कठोर केले आणि त्यांचे ऐकिले नाही. ३. मग अहरोनाने आपली काठी उचलून भूमीच्या धुळीस मारली. मग तीच्या उवा मनुष्यांवर व पशूवर झाल्या. आणि गारुड्यांनी आपल्या गारुडांकडून तसे केले, परंतु त्यांच्याने होईना. तेव्हां गारुडी फारोला ह्मणाले: “हे देवाचेच बोट आहे ?" परंतु फारोचे मन कठोर राहिले आणि त्याने त्यांचे ऐकिले नाही. ४. नंतर परमेश्वराने फारोवर व त्याच्या चाकरांवर व त्याच्या लोकां- कागोमाशा पाठविल्या, परंतु गोशेन प्रांतांत गोमाशा नव्हत्या. तेव्हां फारो ह्मणालाः "तुह्मी जाऊन देशांत आपल्या देवाला यज्ञ करा.” परंतु मोशे बोलला : “आमास रानांत जाऊन यज्ञ केला पाहिजे." फारो म. णाला: “मी तुह्मास जाऊं देईन, केवळ फार दूर जाऊ नका! आणि मजसाठी प्रार्थना करा!" तेव्हां मोश्याने परमेश्वराजवळ प्रार्थना केली, आणि गोमाशा नाहीशा झाल्या, एकही राहिली नाहीं, तथापि फारोने या- वेळेसही आपले मन कठोर करून लोकांस जाऊ दिले नाही. ५.. त्यानंतर परमेश्वराने मिस-यांच्या सर्व पशूवर भारी मरी पाठविली, आणि त्या योगाने सर्व प्रकारचे पशू मेले. तेव्हां फारोने पाठविले, आणि पाहा. इस्राएलांच्या पशूतील एकही मेला नाहीं, तथापि फारोचे मन कठोर राहिले आणि त्याने लोकांस जाऊ दिले नाही. ६. नंतर मोश्याने आपली ओंजळभर आव्यांतील राख घेऊन ती फारोच्या देखतां आकाशाकडे उधळली. मग मनुष्यांस व पशूस गळवें व फोड असे झाले, आणि त्या गळवांमुळे गारुड्यांच्याने मोश्यापुढे उभे राहवेना. परंतु परमेश्वराने फारोचें मन कठोर केले आणि त्याने त्यांचे ऐकिलें नाहीं. नंतर मोशे फारोपुढे उभा राहून त्याला ह्मणाला : “परमेश्वर ची भारी वृष्टि करील, मिसर देशांत आजपर्यंतही झाली नाहीं तसी. प्रत्येक माणूस व पशू रानात सापडतील त्यांवर गारा पडतील