पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिसऱ्यांवरील अरिष्टे. प्रक० ३१ २. तेव्हां मोश्याने परमेश्वरापुढे विनंती केली. आणि परमेश्वर मोश्याला बोललाः “पाहा, म्या तुला फारोजवळ देव असा करून ठेविले, आणि अहरोन तुझा भाऊ तो तुझा भविष्यवादी होईल, आणि मिसरी जाणतील की मी परमेश्वर आहे." मग मोशे व अहरोन फारोजवळ आले, आणि अहरोनाने आपली काठी फारोपुढे टाकली, ती साप असी झाली. मग फारोने याने व यांब्रे नामक (२ तिम० ३,८.) आपल्या जाणयांस व मांत्रिकांस बोलाविले, आणि यांनीही आपल्या गारुडांकडून तसे केले, परंतु अहरोनाच्या काठीने त्यांच्या काच्या गिळिल्या. तेव्हां फारोचें मन कठोर झाले आणि त्याने त्यांचे ऐकिलें नाहीं. प्रक० 3१. मिसऱ्यांवरील अरिष्टे, (निर्ग० ७-११ ) १. आणि परमेश्वर बोललाः “ सकाळी फारोकडे जा; पाहा, तो पा- ण्याकडे बाहर जाईल, तर तूं त्याला भेटायास उभा राहून त्याला ह्मण. इत्र्यांचा देव परमेश्वर असे तुला सांगवितो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी ह्मणून त्यांस जाऊ दे!" तेव्हां मोशे व अहरोन यांनी तसे केले. परंतु फारोने त्यांचे न ऐकिल्यामुळे अहरोनाने आपली काठी उंच करून नदीतल्या पाण्याला मारिले, तेव्हां नदीतले सर्व पाणी पालटून रक झालें, नदीतले मासे मेले आणि नदीची घाण झाली. तेव्हां मिसरी गारुड्यांनी आपल्या गारुडांकडून तसे केले, आणि तसे फारोचे मन कठीण होऊन तो मागे फिरून आपल्या घरी गेला आणि याकडेही त्याने आपले मन लावलें नाहीं. मिसन्यांनी तर नदीच्या आसपास खणन पाणी पिण्यासाठी पाहिले, कांकी त्यांच्याने नदीतील पाणी पिववेना आणि ही अवस्था सात दिवसपर्यंत तसीच राहिली. २. त्यानंतर अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपला हात मिस- राच्या जलांवर लांबविला, तेव्हां बेडूक वरते आले, आणि त्यांनी मिला देशाची भूमि झांकली, आणि बेडूक मिस-यांच्या घरांत व निजण्याच्या खोलीत अंथरुणावर व भठ्यांमध्ये व काठवठींमध्ये आले. मग गारु- ड्यांनी आपल्या गारुडांकडून तसे केले. नंतर फारोने मोशे व अहरोन यांस बोलावून सांगितलेः “परमेश्वराला विनंती करा की त्याने बेडूक दूर