पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( Kee) प्रक० ३०] मोशे फारोसमोर उभा राहतो.

  • ) इस्राएल लोकांस परमेश्वराचा ज्येष्ठ पुत्र असें झटले आहे, कारण पर्यातील सर्व

राष्ट्रातन देवाने इस्राएलाचे राष्ट्र प्रथम निवडून आपलें दत्त करून घेतले आहे. प्रक० 3°. मोशे फारोसमोर उभा राहतो. (निर्ग०५-५.) १. त्यानंतर मोशे व अहरोन जाऊन फारोला ह्मणाले: “परमेश्वर इस्राएलांचा देव असे सांगतो की, माझ्या लोकांनी मजसाठी रानांत सण करावा*), ह्मणून त्यांस जाऊ दे.” फारो बोललाः “परमेश्वर कोण आहे, की, म्या त्याची आज्ञा ऐकून इस्राएलांस जाऊं द्यावे? मी परमेश्वराला जाणत नाहीं, अणखी मी इस्राएलांस जाऊ देणार नाही. तुह्मी लोकांस त्यांच्या कामापासून कां खोळंबवितां? तुह्मी आपल्या बिगार कामावर जा." आणि बिगारीच्या मुकदमांस व नायकांस त्याने असी आज्ञा केली: “त्या माणसांवर भारी काम घाला, आणि त्यांनी त्याप्रमाणे काम करून व्यर्थ गोष्टी- वर चित्त ठेवू नये." तेव्हां ते मुकदम व नायक लोकांस म्हणाले: “इटा करण्यासाठी तुह्मास अणखी गवत मिळणार नाहीं; जा, गवत तुह्मास सांपडेल तेथून मिळवा, परंतु तुमच्या कामांत कांहीं उणे करावयाचे नाही." नंतर लोक गवताच्या ऐवजी सड मिळवायास सर्व मिसर देशांत पसरले. आणि बिगारीचे मुकदम त्यांस घाई करीत आणि इस्राएलाच्या संतानांचे जे नायक होते, त्यांस मार देऊन ह्मणत की: "तुझी मागल्या वेळाप्रमाणे इटा करण्याचा आपला नेम काल व आजही कां पूर्ण केला नाही?" तेव्हां इस्राएलाच्या संतानांचे नायक फारोजवळ ओरडून त्या मुकदमांविषयीं गा-हाणी सांगितली. परंतु तो बोललाः "तुझी आळसी, आळसी आहां, यास्तव म्हणतां आमी जाऊन परमेश्वराला यज्ञ करूं. तर आतां जा. काम करा! गवत तुह्मास मिळायाचें नाहीं, तथापि इटा नेमाप्रमाणे करून द्या!" तेव्हां त फारोजवळून निघत असतां माशे व अहरोन यांस भेटले आणि त्यांस ह्मणाले: “परमेश्वराने तुम्हाकडे पाहावे व न्याय करा- वा, कारण तुह्मी फारोला आमचा कंटाळा यावा असे केले आहे, आणि आम्हास मारावे म्हणून त्याच्या हातीं तरवार दिली आहे."

  • ) फारोने इस्राएल लोकांस अगदी सोडून द्यावे, ही प्रारंभापासून देवाची इच्छा

होती. परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे करायास त्याला सो पडावे, झणून प्रथम केवळ मण करायास त्यांस जाऊं द्यावे हे मागितले. एकदम ह्या लोकांस सोडून द्यावे, असे मागितले असते तर त्यास कठीण एडले असते.