पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ मोश्यास बोलावणे. [प्रक० २९ संगत त्याला पुन्हा प्राप्त होऊन तो आपले काम करू लागला. ३) देश सफळ करणारे नीलनदीचे पाणी तें मिसरी लोकांसाठी सर्व प्रकारचा आशीर्वाद असे होते. परंतु तो आशीर्वाद यहोवाच्या सामर्थाकडून मोश्याच्या हाताचा शाप असा झाला. ४. परंतु मोशे परमेश्वराला ह्मणालाः "हे प्रभू, मी कधीही वक्ता मनुष्य नव्हतो, कां तर मी जड जिभेचा आहे." परमेश्वर त्याला बोलला : "मनुष्याचे तोड कोणी केले? अथवा मुका किंवा बहिरा किंवा डोळस किंवा अंधळा कोण करितो? तो मी परमेश्वर नव्हे काय ? तर आतां चल, ह्मणजे मी तुझ्या तोंडाला अनुकूळ होईन आणि जे खा बोलावे ते मी तुला शिकवीन.” त्यावर मोशे ह्मणालाः “हे प्रभू ज्याला पाठविसील, त्याला पाठीव!"*) तेव्हां परमेश्वर रागे भरून बोललाः "अहरोन तुझा भाऊ तो चांगले बोलेल हे मला ठाऊक नाही काय? आणखी पा- हा, तो तुला भेटायास येईल. मग तो तुजसाठी लोकांसी बोलेल : तेव्हां तो तुझे मुख होईल आणि तूं त्याला देवाच्या ठिकाणी होसील).

  • ) इस्राएल लोकांची सुटका करण्याची जेव्हा मोश्याची इच्छा होती त्या वेळेस परमे-

श्वराची इच्छा नव्हनी, कारण त्यासमयीं मोशे स्वपराक्रमावर भरवसा ठेवन या कामास प्रवृत्त झाला होता. आतां प्रभूची इच्छा झाली असताही मोशे नाकबूल कारतो, कारण ज्या ४० वर्षांतन तो रानांत वास करीत होता त्यांत त्याची तरुणपणांतील चपळाई मंद झाली आणि खशक्तीविषयीं तो निराश झाला. +) देव आणि भविष्यवादी यांजमध्ये जसा संबंध असतो तसा मोशे व अहरोन यामध्ये असावा. जे काही मोशे वाला मचवी ते अहरोनाने बोलावे. ५. आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले कीः "फारोला बोल की, पर- मेश्वर असें ह्मणतो, इस्राएल माझा ज्येष्ठ पुत्र आहे *), तर मी तुला सांगतो की, तूं माझ्या पुत्राला जाऊ दे, नाही तर मी तझ्या ज्येष्ठ पुत्राला जीवे मारीन." आणि परमेश्वराने अहरोनाला सांगितले: “मोश्याला भेटायास रानांत जा." मग तो जाऊन देवाच्या डोंगरांत त्याला भेटला, आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. नंतर दोघे जाऊन इस्राएलाच्या संतानांच्या सर्व वडिलांस एकवट केले, आणि ज्या सर्व गोष्टी परमेश्वराने मोश्याला सांगि- ल्या होत्या त्या अहरोनाने त्यांस सांगितल्या आणि मोश्याने ते चमत्कार लोकांच्या देखतां केले. तेव्हां लोकांनी विश्वास धरिला आणि परमेश्व- राने इस्राएलांच्या संतानांची भेट घेतली आणि त्यांच्या दुःखाकडे लक्ष दिले ह्मणून त्यांनी लवन भजन केले.