पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २८] माश्याचा जन्म आणि त्याचे पलायन. ६५ ७.२५). नंतर एका दुसऱ्या दिवसीं तो बाहेर गेला, तेव्हां दोन इब्री मनष्य भांडत होते; तो त्यांतल्या अपराध्याला बोललाः “तूं आपल्या शेजा- न्याला कां मारतोस?" हा बोललाः "तुला आमावर नायक व न्याया- धीश कोणी नेमले? जसे खा मिसऱ्याला जीवे मारिले तसे तूं मला जीवे मारायास पाहतोस काय?" तेव्हां मोशे भिऊन ह्मणालाः "खचीत ही गोष्ट कळली आहे." आणि ही गोष्ट फारोनेही ऐकली, तेव्हां तो मोश्याला जीवे मारायास झटला. मग मोशे फारो पुढून पळून गेला*).

  • ) मोश्याला ईश्वराने आज्ञा दिली नसता तो आपल्या लोकांबद्दल सूड घ्यायास

आणि त्यांचा खंडणारा व्हायाप्त इच्छित होता. परंतु त्या कामासाठी अझन त्याची सिद्धता नव्हती. अधिकार कसा चालवावा हे तो फारोच्या राजवाड्यात राहून शिकला होता, परंत सेवाधर्म शिकायास त्याला ४० वर्षे रानांत नीच अवस्थेत राहाण्याचें अगत्य र त्याच्या तरूणपणांतील चपळाईस पोक्तपणांतील विचाराचा जोडा पाहिजे होता.' आणि स्वशक्तीवरील त्याचा भरवसा ढळन तिजविषयों त्याला कंटाळा उत्पन्न व्हावा, आणि याने आपला सर्व भरवसा केवळ देवाच्या सामर्थ्यावर ठेवावा हे योग्य होते, म्हणून देवाने याला मिद्यानी नामक रानांत नेले. ४. मोशे तर मिद्यान देश (तांबड्या समुद्राच्या दोन अखातांमध्ये जो सीना नामक द्वीपकल्प तोच) यांतील एका विहिरीजवळ जाऊन राहिला. आणि मिद्यानांतील याजकाच्या सात कन्या होत्या, त्या येऊन आपल्या बापा- ची मेंढरे पाजायाला पाणी काढून कुंड्या भरीत होत्या; तेव्हां कोणी मेंढके येऊन त्यांस तेथून घालवू लागले; परंतु मोश्याने त्यांचे सहाय करून त्यांच्या मेंढरांस पाजले, आणि त्या आपला बाप रगुवेल याकडे आल्या तेव्हां तो बोलला: "आज इतके लवकर कसे आला आहां बरे?" त्या झणाल्याः “मिसरी मनुष्याने आह्मासाठी पाणी काढून मेंढरांस पाजले." तो आपल्या कन्यांस ह्मणाला : "तो कोठे आहे ? तुझी त्या मनुष्याला सो- डन का आलां? त्याला जेवायास बोलावा.” नंतर मोशे या मनुष्यापासी महायास मान्य झाला आणि त्याने आपली कन्या जिपोरा मोश्याला दिली. ती त्याला गे!म आणि अलियेजर असे दोन पुत्र प्रसवली, 91