पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ मोश्याचा जन्म आणि त्याचे पलायन. प्रक० २८ २. आणि लेवीच्या घराण्यांतील अम्राम नामक माणसाने जाऊन लेवी वंशांतील योखेबेद नामक कन्या बायको करून घेतली. ती बायको पुत्र प्रसवली; आणि तो सुंदर आहे असे पाहून तिने त्याला तीन महिने लपविले; आणि त्याला आणखी लपवावे हे तिला साधेना, तेव्हां तिने लव्हाळ्यांची पेटी घेतली, आणि तिला भूमितैल व राळ इहींकडून लेपिले, आणि तींत बाळक घालून नदीच्या तिरी लव्हाळ्यांत ठेवले; आणि त्याला काय होईल हे पाहायास त्याची बहीण मिर्याम दूर उभी राहिली. आणि फारोची कन्या नदीवर स्नानास आली, तेव्हां तिने पेटी लव्हाळ्यांत पाहून आपल्या दासीला पाठवून ती आणली. नंतर ती उघडून बाळकाला पाहिले, आणि पाहा मूल रडत आहे; तेव्हां तिला त्याचा कळवाळा येऊन ती ह्मणाली: "हे इत्र्यांच्या लेकरांतील एक आहे.” तेव्हां जबळ येऊन याची बहीण फारोच्या कन्येला ह्मणाली: “मी जाऊन तुजसाठी इत्रिणीं- मधून एखादी दाई बोलावू काय? ह्मणजे ती तुजसाठी या बाळकाला स्तन पाजील.” राजकन्या बोलली: “जा." मग तिने जाऊन आपल्या आईला बोलावून आणले. तेव्हां राजकन्येने तिला सांगितले की: “या बाळकाला घेऊन मजसाठी स्तन पाज झणजे मी तुला वेतन देईन." आणि बाळक मोठा झाल्यावर तिने त्याला फारोच्या कन्येकडे आणलें, आणि तो तिचा पुत्र असा झाला; आणि तिने त्याचे नांव मोशे ठेवले कारण तिने मटले: “म्या त्याला पाण्यांतून ओढले." आणि तो मिसयां- च्या सर्व विद्या शिकलेला होता आणि बोलण्यांत व करण्यांत पराक्रमी होता (प्रेषि० ७,२२). ३. आणि मोशे ४० वर्षांचा झाला तेव्हां तो आपल्या भाऊबंदांकडे गेला. कारण की त्याने फारोच्या कन्येचा पुत्र ह्मणविण्यास विश्वासाने नाकारले, आणि पापाचा अल्पकालिक उपभोग घेण्यापेक्षा देवाच्या लो- कांसंगतीं दुःख भोगणे हे त्याने निवडून घेतले (इब्री ११,२४,२५) नेली त्याने त्यांची कष्टाची कामे पाहिली आणि मिसरी मनुष्यास आपल्या भाऊबं- दांतील एका इब्री मनुष्याला मारितांना पाहिले. आणि इकडे तिकडे न्याहा- ळून, कोणी नाही, असे पाहून त्याने त्या मिसन्याला जिवे मारिलें, आणि त्याला वाळूत लपविले. माझ्या हाताने माझ्या भावांस देव सोडवील, असे त्यांस समजेल ह्मणून त्याला वाटले; पण त्यांस समजले नाहीं (प्रेषि०