पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २८ मोश्याचा जन्म आणि त्याचे पलायन. ६३ जसा माझा सेवक ईयोब ठीक बोलला तसे तुह्मी मजविषयी बोललां नाही. तर आतां तुह्मी आपणासाठी होम करा, आणि म्या तुह्मासी तुम- च्या मूर्खखाप्रमाणे करूं नये, ह्मणून माझा सेवक ईयोब याने तुह्मासाठी प्रार्थना करावी." आणि परमेश्वराने कृपा दृष्टीने ईयोबाकडे पाहिले, आणि जे काही त्याचे पूर्वी होते त्याच्या दुप्पट परमेश्वराने आणखी त्याला दिले आणि परमेश्वराने त्याची शेवटली स्थिति त्याच्या पूर्व स्थितीपेक्षा अधिक आशीर्वादित केली. आणि त्याला सात पुत्र होते व तिघी कन्या होत्या. त्यानंतर ईयोब १४० वर्षे वांचला, आणि त्याने आपले पुत्र व आपल्या पुत्रांचे पुत्र चोहो पिढ्यांपर्यंत पाहिले. मग ईयोब वृद्ध व पूर्ण वयाचा होऊन मरण पावला. तिसरा भाग. मोश्याविषयीं वृत्तांत. निर्गम १-अनुवाद 3४. प्रक० 2८. मोश्याचा जन्म आणि त्याचे पलायन. (निर्ग.१ व २). १. योसेफ मरण पावला, तेव्हां इस्राएलाची संताने फार वाढली. नंतर ज्याला योसेफ ठाऊक नव्हता असा मिसर देशाचा दुसरा राजा झाला. तो बोललाः “पाहा, इस्राएलाच्या संतानांचे लोक आह्मापेक्षा शक्तिमान् आहेत; चला, आपण त्यांसी चतुराईने वागू, नाहीं तर लढाई लागल्यास ते आमच्या शत्रुस मिळतील व आह्मासी लढतील." मग त्यांस कठीण कामाने जाचावे ह्मणून त्यांनी त्यांपासून बिगार घेण्यासाठी मुकदम देविले; परंतु त्यांनी जसजसे त्यांस जाचले, तसतसे ते वाढून विस्तारले. तेव्हां फारोने आपल्या सर्व लोकांस असी आज्ञा दिली की: "इस्राएलांत जो प्रत्येक पत्र जन्मेल त्याला नदीत टाका आणि प्रत्येक कन्येला वांचवा.