पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ईयोवाची गोष्ट. [प्रक० २७ ण्याने आपण देवाच्या पक्षाने बोलतो असे त्यांस वाटले होते, ह्या त्यांच्या निष्ठुर व अल्पबुद्धि आरोपावर ईयोबाने प्रत्युत्तर देऊन त्यांस कुंठित केले. तथापि आपल्या मित्रांच्या निर्बुद्धि वादामुळे तो नम्र भाव न बाळगितां आपल्या न्यायीपणावर टेकून देवाचा देखील वादी झाला. तरी आपला निर्दोष- पणा देव अझून उजेडात आणील असा भरवसा राखून तो बोलला : "मी जाणतो की माझा खंडणारा जीवंत आहे, आणि अंतकाळी भूमीवर उभा राहील; आणि माझी बचा नष्ट झाल्यानंतर किड्यांनी है शरीर नासले, तरी मी आपल्या देहाच्या ठायीं देवाला पाहीन." तेव्हां ते तिघे जण स्तब्ध होऊन उगेच राहिले. ५. आणि अलीहू (चौथा मित्र) जो दुसऱ्यांपेक्षां धाकटा असल्यामुळे आतांपर्यंत स्वस्थ राहिला होता, ईयोबाने आपणाला देवासमोर निर्दोषी ठरवून घेतले, ह्मणून तो त्यावर रागे भरला आणि त्याच्या मित्रांनी ईयोबाला दोषी ठरविले आणि त्याला प्रत्युत्तर न देतां कुंठित झाले, ह्मणून त्यांजवर- ही तो रागे भरला व बहुत बोध करून हेही ह्मणाला की "देव मनुष्यांचा कान उघडितो, त्यांचा संबोध ठसवितो यासाठी की, त्याने मनुष्य आपले कार्य सोडी असे करावे आणि पुरुषापासून गर्व झाकावा. तो मनुष्यास आपल्या पलंगावरही कष्ट भोगून शिक्षा पावू देतो. पाहा, त्याचा प्राण नाशापासून परत आणावा यासाठी देव हे सर्व करितो.” जेव्हां अलीहने हे आपले भाषण समाप्त केले, तेव्हां ईयोबही निरुत्तर होऊन उगाच राहिला. ६. मग परमेश्वराने वावटळीतून ईयोबासी बोलून अर्से झटले: "पुरुषासारखी आपली कंबर बांध, ह्मणजे मी तुला विचारीन, मग तूं मला सांग, जेव्हां म्या पृथ्वीचा पाया घातला आणि पाहटेच्या तान्यांनी एक- दां गाइलें व देवाच्या पुत्रांनी हर्षनाद केला, तेव्हां तूं कोठे होतास? तं बुद्धिसंपन्न असलास तर हे प्रगट कर.” मग ईयोब परमेश्वराच्या प्रश्नावि- षयी निरुत्तर होऊन ह्मणाला: “मी कबूल करतो की, जे मी समजलों नाहीं ते, आणि मजपेक्षां वर्चढ ज्या आश्चर्य गोष्टी म्या जाणिल्या नाहीत त्याही मी बोललो आहे, यामुळे मी आपणाला कंटाळतो, आणि धूळ व राख यांवर बसून अनुताप करतो." आणि अलीफज याला परमेश्वर ह्मणा- लाः “तुजवर व तुझ्या दोघां मित्रांवर माझा क्रोध पेटला आहे, कां की