पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २७ ईयोवाची गोष्ट. व तुला वर्तमान सांगायाला मी मात्र एकटा सुटून आलो आहे." तो बोलत असतांच कोणी येऊन ह्मणाला : “तुझे पुत्र व तुझ्या कन्या ही खात व द्राक्षरस पीत होती, आणि पाहा, रानांतून मोठा वारा आला व घराला लागला, तेव्हां ते तरण्यांवर पडले आणि ती मरून गेली आहेत." तेव्हां ईयोबाने उठून आपला झगा फाडला आणि आपले डोके कातरले व भूमीवर पडून भजन केले व मटले: “मी आपल्या आईच्या उदरांतून नागवा आलो व तिकडेही नागवा परत जाईन, परमेश्वराने दिले व पर- मेश्वराने परत घेतले आहे, परमेश्वराचे नाम सुवंदित असो!" ___३. अणखी असे झाले की, देवाचे पुत्र परमेश्वरासमोर उभे राहा- यास आले आणि त्यांमध्ये सैतानही आला. आणि परमेश्वराने सैतानाला मटले. “माझा सेवक ईयोब याजकडे तूं आपले मन लावून समजला आहेस काय? की पृथ्वीवर त्यासारखा कोणी नाहीं; आणि अझूनपर्यंत तो आपले पूर्णपण अखंड धरितो." सैतानाने उत्तर दिले : “जे कांहीं मनुष्याचे असेल ते तो आपल्या जीवाबद्दल देईल; परंतु आपला हात पुढे करून त्याच्या हाडाला व त्याच्या मांसाला शीव ह्मणजे तो निश्वये तुझ्या तोंडावर शापील!" परमेश्वराने मटले: “पाहा, तो तुझ्या हाती आहे, केवळ त्याचा जीव वांचूं दे." मग सैतानाने परमेश्वरासमोरून जाऊन ईयोबाला त्याच्या तळपायापासून त्याच्या शेंडीपर्यंत वाईट गळयांनी पीडिले असे की, त्याने आपले अंग खाजवावे ह्मणून खापरी घेतली व तो राखेवर बस- ला. तेव्हां त्याची बायको त्याला ह्मणालीः "तूं अझूनपर्यंत आपले पूर्णपण धरतोस काय? देवाला शाप दे व मरून जा." परंतु त्याने तिला झटले : “आह्मी देवापासून चांगले घ्यावे आणि वाईट घेऊं नये काय? या सर्वांत ईयोबाने पाप केले नाही. ४. आणि त्याचे तिघे मित्र ह्मणजे अलीफज, बिल्दद व सोफर हे त्याचे शांतवन करावे ह्मणून आले. मग ते त्याजवळ सात दिवस व सात रात्री भूमीवर बसले आणि त्यासी कोणी काही बोलला नाहीं, कांकी त्याचे दुःख फार आहे, असे त्यांनी पाहिले. त्यानंतर ईयोब आपले तोंड उघ. टन आपल्या दिवसाला शाप देऊ लागला. तेव्हां त्याचे मित्र त्याजवर दोष ठवन म्हणाले की, दुसन्यांपेक्षा हा पापी नसता, तर सर्व मनुष्यांहन देवाने याला सुखी ठेविले असते दुःख दिले नसते. आणि असे बोल-