पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ईयोबाची गोष्ट. [प्रक० २७. प्रक० 2७. पुरवणी. ईयोबाची गोष्ट. ऊस देश (बहुतकरून अदोमी डोंगराच्या रांगेपासून ईशान्य दिशेस असावा) यांत ईयोब नामें एक मनुष्य राहत होता, तो देवाला भिणारा व पापापासून दूर राहणारा होता. त्याला सात पुत्र व तीन कन्या झाल्या, त्याची घरची दारची मनुष्ये पुष्कळ आणि कळप बहुत होते की, तो मनुष्य पूर्वच्या सर्व जणांतला मोठा होता. आणि त्याचे पुत्र एकमेकांच्या घरास एकेक आपापल्या दिवसीं जाऊन भोजन करीत असत, आणि निरोप पाठवून आपल्या तिघां बहिणींस आपणांसंगती खायाप्यायाला बोलावीत असत. आणि असा दिवस समाप्त होई, तेव्हां ईयोब आपल्या पुत्रांसाठी होम करीत असे, कां की तो ह्मणे: "कदाचित् माझ्या लेकरांनी पाप केले असेल."-आणि असे झाले की, देवाचे पुत्र (देवदूत) परमेश्वरा- समोर उभे राहयास आले, आणि त्यांमध्ये सैतानही आला. तेव्हां परमे- श्वराने त्याला मटलेः “तूं कोठून आला आहेस ?" सैतान ह्मणाला : “ मी पृथ्वीवर इकडे तिकडे फिरून व तिजवर खाली वर हिंडून आलो." परमेश्वराने ह्मटले: "माझा सेवक ईयोब याकडे तूं आपले मन लावून समजला आहेस काय? की पृथ्वीवर त्या सारखा कोणी नाहीं." सैतानाने उत्तर दिले : "ईयोब देवाचे भय फुकट धरितो काय? त्या त्याच्या हातांच्या कामाला आशीर्वाद दिला, ह्मणून त्याचे धन देशांत बाढले आहे." तेव्हां परमेश्वराने झटले : "पाहा, जे काही त्याचे आहे ते तुझ्या हाती दिले आहे ; ईयोबाला मात्र आपला हात लावू नको.” मग सैतान परमेश्वरासमोरून गेला. २. आणि एका दिवसी त्याचे पुत्र व त्याच्या कन्या ही आपल्या वडील भावाच्या घरीं खात व द्राक्षरस पीत होती, तेव्हां ईयोबाकडे दत येऊन ह्मणाला: "बैल नांगरीत होते व गाढवे चरत होती, तेव्हां शबांनी दरवडा घालून त्यांस हरून नेले व गडी तरवारीने हाणले आहेत, आणि तला वर्तमान सांगायास मी मात्र एकटा सुटून आलो आहे.” तो बोलत अस- तांच दुसरा येऊन ह्मणाला : "देवाच्या अग्नीने आकाशांतून पड़न मेंढ- रांस व गड्यांस जाळून नष्ट केले आहे, आणि तुला वर्तमान सांगायाला मी मात्र एकटा सुटून आलो आहे." तो बोलत असतांच तिसरा येऊन ह्मणाला कम्द्यांनी उंटांस हरून नेले आहे व गड्यांस तरवारीने हाणले आहे