पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २६] योसेफाचे अंतकाळचे दिवस. ___३. बापाच्या मरणानंतर योसेफाच्या भावांस असे भय पडले की, जे वाईट आमी योसेफाचे केले ते अवघे तो आमास परत करील; यास्तव त्यांनी पाठवून योसेफाला पटले: “तुझ्या बापाने आपल्या मरणापूर्वी आज्ञा दिली की, योसेफाला असे सांगा, 'मी विनंती करितो, तूं आपल्या भावांचा अपराध कृपेने क्षमा कर.' तर आतां कृपेने आपल्या बापाच्या देवाचे दास या आमच्या अपराधाची क्षमा कर." तेव्हां आपणाजवळ ते बोलत असतां योसेफ रडला आणि त्यांस ह्मणालाः "भिऊ नका, कारण मी देवाच्या ठिकाणी आहे काय? तुह्मी तर मजवर वाईट योजिले, ते देवाने बऱ्यासाठी योजिले, जसे या दिवसी झाले तसे करून बहुत लोकांस वांच- वावे.” असे त्याने त्यांचे समाधान केले, आणि त्यांसी गोड भाषण केले. आणि योसेफाने आपल्या भावांस शपथ घालून मटले: “देव तुमच्या भेटी- स येईलच, आणि तुह्मास या देशांतून जो देश त्याने अब्राहामासी व इझा- कासी व याकोबासी शपथेने देऊ केला, त्यांत वर नेईल, तेव्हां माझी हाडे एथून आपल्यासंगतीं वर न्या.” नंतर योसेफ ११० वर्षांचा होऊन मेला, आणि त्यांनी त्याला सुगंधित करून मिसर देशांत पेटीत ठेविलें. सूचना. इस्राएलांची वंशावळी. तेरह नाहोर अब्राहाम मिल्केपासून हागारापासून सारेपासून इस्का, मिल्का, लोट बथुबेल इश्माएल इझाक हारान रिब्केपासून - - आम्मोन, मवाब. लाबान, रिब्का लेआ, राहेल. एसाव (अदोम); याकाबे (इस्राएल) लेआपासून : बिल्हापासूनः जिल्पापासून: राहेलापासून : रऊबेन, शिमोन, दान व नाफताली. गाद व आशेर. योसेफ व बन्यामीन, लेवी, यहूदा, इस्साखार, जवुलून, दीना. एफ्राइम व मनश्शे.