पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ याकोबाचे आणि योसेफाचे अंतकाळचे दिवस. [प्रक० २६ याकोवाने योसेफाचे दोन पुत्र दत्त घेतल्यामुळे त्याचे एकंदर १३ वंश झाले, परंतु पुढे लेवीचा वंश पवित्रस्थानाची सेवा करण्याकरिता निराळा होऊन पूर्वीचे जे बारा वंश तेच कायम राहिले.-खनान देशामध्य अत्राहामाने तयार केलेल्या प्रेतस्थानांत आपण परले जावे, असो याकोबाची इच्छा. तो अब्राहामासारखा आपला विश्वास आहे हे दाखवि- ण्यास प्रमाणरूप होती. २. आणि याकोबाने आपल्या १२ पुत्रांस आपणाकडे बोलाविले. आणि पुढील दिवसांमध्ये जे त्यांस घडणार ते प्रत्येकाला सांगितले. आणि यहदाची पाळी आली तेव्हां तो ह्मणाला: "यहूदा, तुझे भाऊ तुला स्तवतील; तुझा हात तुझ्या शबूंच्या मानेवर होईल; तुझ्या बापाचे पुत्र तुला नमतील. यहूदा सिंहाचे पिलू आहे'; माझ्या पुत्रा, तूं शिकारी- वरून चढलास; तो दबून सिंहासारखा व सिंहिणीसारखा बसला त्याला कोण उठवील? यहूदापासून राजवेत्र आणि शक चालविणारा त्याच्या पायांमधून शीली येईपर्यंत सरणार नाही, आणि त्याला लोक वश्य होतील" *). आणि याकोब आपल्या पुत्रांविषयीं भविष्य सांगणे संपल्यावर मेला. तेव्हां योसेफ आपल्या बापाच्या तोडावर पडून रडला आणि त्याचे चुंबन घेतले, मग योसेफाने आपल्या बापाला सुगं- धित करण्याची आज्ञा आपले चाकर जे वैद्य त्यांस दिली, हे काम ४० दिवस चालले, आणि मिसरी त्याच्यासाठी ७० दिवस रडले. त्यानंतर योसेफ आपल्या बापाला पुरायास गेला आणि त्याबरोबर त्याचे सर्व भाऊ आणि फारोचे दास व घरचे वडील रथ व स्वार संगतीं घेऊन गेले. तसे त्याच्या पुत्रांनी माखपेला गुहेत त्याला पुरिले. _*) मशीहा किंवा खीस्त याविषयी स्पष्ट दिलेले हे तिसरें वचन आहे. प्रथम आ- दामापासून अब्राहामापर्यंत स्त्रीचें संतान (प्रक० ३. २), याकडून तारण होईल, म्हणन वचन होते. नंतर अब्राहामाच्या संतानाकडून (प्रक० ८.२), आणि आता यहूदाच्या वंशा. नन तारण होईल. हा नवीन भविष्यार्थ असा आहे की, जगाचा तारणारा यहदाच्या वंशान उत्पन्न होईल, आणि तोपर्यंत यहूदाच्या वंशांतील अधिकार राहील. शीलो झणजे का देणारा किंवा तारणारा येईल, तेव्हां सर्व राष्ट्र त्याजकडे मिळतील आणि त्याजकरन यहूदाच्या जगसंबंधी अधिकाराबद्दल सर्वकाळचा त्याचा आकाशांतील अधिकार होईल. याप्रमाणे घडूनहीं आलें, कारण खीस्ताच्या मरणापूर्वी थोडा काळ रोमी लोकांनी यह दी लोकांची स्वतंत्रता अगदीं मोडुन टाकली, परंतु खोस्त जो यहूदा वंशांनील सिंह (प्रगा। ५. ५) त्याने यहूदा, जगीक राजवेन सर्वकाळच्या अधिकाराचे केले आहे.