पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २६] याकोबाचे आणि योसेफाचे अंतकाळचे दिवस. ५७ इस्राएल लोक खनान देशात राहिले असते, तर ते खनानी लोकांमध्ये मिश्रित होऊन गेले असते असें भय होते. गोशेन प्रांतांत असे काही भय नव्हते, कारण चारणजीवी लोकांस मिसरी लोक ओंगळ मानीत होते. प्रक० २६. याकोबाचे आणि योसेफाचे अंतकाळचे दिवस. (उत्प० ४८-५०). . १. तसे इस्राएल गोशेन प्रांतांत राहिला,आणि तेथे त्यांस धन मिळा- ले आणि ते सफळ होऊन फार वाढले. आणि याकोब मिसर देशांत १७ वर्षे वांचला; तसे याकोबाचे आयुष्य १४७ इतकी वर्षे झाले. आणि इस्राएलाचा मरणकाळ जवळ आला, तेव्हां त्याने योसेफाला बोलावून त्याला शपथ घातली की, त्याने त्याला मिसरांत नको तर आपल्या वडि- लांजवळ त्यांच्या प्रेतस्थानांत पुरावे. या गोष्टीनंतर कोणी योसेफाला सांगितले : “पाहा, तुझा बाप दुखणाईत आहे.” तेव्हां तो आपले दोन पुत्र मनश्शे व एफ्राइम यांस आपल्या संगती घेऊन बापाकडे गेला. तेव्हां इस्राएल आयासाने बिछान्यावर उठून बसला आणि ह्मणाला : “पाहा, मी मिसरांत तुजकडे आल्यापूर्वी तुझे दोन पुत्र, जे तुजपासून मिसर दे- शांत जन्मले,ते जसे रऊबेन व शिमोन तसे माझे होतील." तेव्हां इस्राएलाने आपला उजवा हात पुढे करून एफ्राइम जो धाकटा त्याच्या मस्तकावर ठेवला, आणि आपला डावा हात मनश्शाच्या मस्तकावर ठेवला; जाणून त्याने तसे केले आणि त्यांस आशीर्वाद देऊन तो ह्मणालाः “ज्या देवा- समोर माझे पूर्वज अब्राहाम व इझाक चालले, ज्या देवाने पूर्वीपासून आजपर्यंत माझे पालन केले, ज्या दूताने मला सगळ्या वाइटांपासन उद्ध- रलें, तो या मुलांस आशीर्वाद देवो आणि ते पृथ्वीवर वाढून समुदाय होवोत!" आणि याकोब योसेफाला अणखी ह्मणालाः “पाहा मी मरतो, परंतु देव तुह्मासंगती असत जाईल, आणि तुह्मास तुमच्या वडिलांच्या देशास माघारे नेईल"*).

  • ) योसेफाचे पुत्र याकोबाचे दत्तपुत्र होऊन चारणंजीवी लोकांच्या स्थितीस आले.

योसफानेही याविषयी कबूल केलें, कारण आपल्या लोकांविषयीं जी देवाची वचनें त्यां- जवर त्याने पूर्ण भाव ठेवला होता. म्हणून आपल्या पुत्रांसाठी सिसर देशांतील उंच पदवी मिळविण्यापेक्षा त्यांस आपल्या भावामध्ये असू देणे हे अधिक वरे, असे त्याला वाटले. 81