पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ याकोबाचे मिसर देशास जाणे. [प्रक० २५ प्रक० २६. याकोबाचें मिसर देशास जाणे.(उत्प०४६ व ४७). १. नंतर इस्राएल आपल्या अवघ्यासुद्धा निघून बैरशेब्यास आला. तेथे त्याने यज्ञ केले. तेव्हां रात्रींतील दृष्टांतामध्ये देव इस्राएलासीं ह्मणालाः “मी देव, तुझ्या बापाचा देव आहे; मिसरांत जाण्याविषयी भिऊ नको, कां तर तेथे तुझे मोठे राष्ट्र करीन. मी तुजबरोबर जाईन आणि मी तुला परत आणीनच."- याकोबाच्या घरचे सगळे प्राणी जे याबरोबर मिसरांत गेले, ते त्याच्या पुत्रांच्या बायका खेरीज सत्तर होते. आणि याकोबाने आपल्या पुढे यहूदाला योसेफाकडे पाठविले, मग योसेफ आपला बाप इस्राएल याला भेटायास गोशेनाकडे गेला आणि त्याला पाहून त्याच्या मानेवर पडला. तेव्हां इस्राएल ह्मणालाः “म्या तुझे मुख पाहिले, तूं अझून जीवंत आहेस, तर आतां मला मरण येवो.” ___२. तेव्हां योसेफाने येऊन फारोला सांगितले की, माझा बाप व माझे भाऊ आले आहेत. मग त्याने आपल्या भावांमधून पांच घेऊन त्यांस फारो पुढे उभे केले. तेव्हां फारो त्यांस ह्मणालाः “तुमचा धंदा काय आहे ?" ते बोलले: “तुझे दास आह्मी मेंढके आहों, आमचे वडील- ही तसेच." आणि गोशेन प्रांतांत त्याने त्यांस राहू द्यावे ह्मणून त्यांनी मागितले * ). फारोने योसेफाला झटले की: “तुझा बाप व तुझे भाऊ आहेत. मिसर देश तुझ्या समोर आहे, देशांतील चांगल्या भागी त्यांस राह दे, गोशेन प्रांतांत यांनी राहावे. आणि त्यांमध्ये कोणी गुणी मनुष्य आहेत असें तूं जाणतोस, तर त्यांस माझ्या कळपांवर अधिकारी करून ठेव." नंतर योसेफाने आपला बाप याकोब यालाही आणून फारो पुढे उभे केलें. तेव्हां फारो याकोबाला बोललाः "तुझे वय किती आहे ?" तो ह्मणाला "माझ्या प्रवासांतील दिवसांची संख्या १३० वर्षे झाली; माझ्या आयुष्या- चे दिवस थोडके व वाईट झाले, आणि माझ्या वडिलांच्या प्रवासामध्ये यांच्या आयुष्यांच्या वर्षांच्या दिवसांइतके झाले नाहीत." आणि याकोब फारोला आशीर्वाद देऊन त्यापुढून निघाला. _* गोशेन प्रांत हा मिसर देशाच्या पूर्व भागांत आहे. तो लुसी नामक नील नदीच्या पाण्यापासून झालेला मिसर ओहोळ (हिनकोलुरा) जो खनान देशानी मर्यादा आहे, तेथपर्यंत पसरला आहे. तो प्रांत विस्तीर्ण असून बहुन व उत्तम करणांनी व्यापला आहे.-