पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २४] योसेफ आपल्या भावांस ओळख देतो. यावरून तुमच्या मनांत दु:ख होऊ देऊ नका, कांकी जीव राखायासाठी देवाने मला तुमच्या पुढे पाठविले आहे; कांतर ही दोन वर्षे देशांत दुकाळ झाला. आणि ज्यांत नांगरणी व कापणी होणार नाहीत असीं अणखी पांच वर्षे आहेत; तर आतां तुह्मी नव्हे तर देवाने मला एथे पाठविले. खरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा की तुझा पुत्र योसेफ असे ह्मणतोः “देवाने मला अवघ्या मिसर देशाचा धनी केले, तूं मजकडे खाली ये, उशीर करूं नको, एथे मी तुझा प्रतिपाळ करीन, कांकी दुकाळाची अणखी पांच वर्षे आहेत. खरा करून तुह्मी माझ्या बापाला इकडे खाली आणा.” तेव्हां तो आपल्या बन्यामीन भावाच्या मानेवर पडून रडला आणि त्याने आपल्या सर्व भावांचे चुंबन घेतले. ४. आणि योसेफाचे भाऊ आले आहेत ही गोष्ट फारोच्या ऐकण्यांत येऊन त्याच्या दृष्टींत बरे वाटले, आणि तो योसेफाला ह्मणालाः "तूं आपल्या भावांस सांग की, तुह्मी खनान देशास जा आणि तुमच्या बापाला व तुमच्या सर्व कुटुंबांला घेउन मजकडे या. तुमच्या लेकरांसाठी आणि तुमच्या बाय- कांसाठी मिसर देशांतून गाड्या घ्या आणि आपल्या दृष्टीने आपल्या वस्तूंवर ममता ठेवू नका, कांतर अवघ्या मिसर देशांतले उत्तम ते तुमचे आहे." मग ते जाऊन आपल्या बापाकडे आले आणि त्यांनी त्याला सांगितले की: "योसेफ अझून जीवंत आहे, अणखी तो सर्व मिसर देशावर अधिकार करीत आहे.” हे ऐकून याकोबाचे मन गुंग झाले, कांतर तो त्यांवर विश्वासला नाही. परंतु आपणासाठी ज्या गाड्या योसेफाने पाठविल्या त्या त्याने पाहिल्यावरून त्याच्या जिवांत जीव आला आणि तो ह्मणालाः "पुरे! माझा पुत्र योसेफ अझून जीवंत आहे, आपल्या मरणापूर्वी मी जाऊन त्याला पाहीन." सूचना.-योसेफाचे भाऊ फार वेळपर्यंत अंत:करणाचे कठीण राहि- ल्यामुळे अनेक प्रकारे त्यांस शिक्षा भोगावी लागल्यानंतर ते नम्र भावाने आणि अनुतापी मनाने योसेफाला जसे नमले; तसे पुढे यहूदी लोक, जे आजपर्यंत अविश्वासू होऊन राहिले आहेत, ते बहुत दुःखें सोसन शेवटीं खीस्ताकडे फिरून येतील, आणि तो त्यांजवर कृपा करून त्यांच्या तारणासाठी यांचा अंगीकार करील.