पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ योसेफ आपल्या भावांस ओळख देतो. प्रक० २४ ठीमागे जा." मग तो त्यांस आटोपून ह्मणालाः "तुझी बऱ्याच्या ठिकाणी वाईट कां केले? तुझी माझ्या धन्याचा प्याला चोरला की नाहीं." ते त्याला ह्मणाले: “पाहा, जो पैका आह्मास आपल्या गोण्यांच्या तोंडी सांपड- ला तो आह्मी परत आणला; तर रूपे किंवा सोने आह्मी कसे चोरूं? ब्याजवळ ते मिळेल तो मरो, आणि आमीही आपल्या धन्याचे दास हो- ऊं." कारभारी बोललाः "तुमच्या सांगण्याप्रमाणे होवो,ज्याजवळ तो मिळेल तो माझा दास होईल.” तेव्हां त्यांनी आपआपली गोणी उतरून सोडली. मग तो वडिलापासून शोध करीत धाकट्यापर्यंत आला,तेव्हां बन्यामीनाच्या गोणीत प्याला सांपडला. मग त्यांनी आपली वस्त्रे फाडली व आपली गाढवे लादून नगरांत परत आले. २. आणि यहूदा आपल्या भावांसुद्धां योसेफाच्या घरी आला, मग ते त्यासमोर भूमीवर पडले. तेव्हां योसेफ त्यांस बोललाः "तुह्मी जे काम केले ते कसे?" यहूदा ह्मणालाः “आह्मी काय सागू? तुझ्या दासांचा अन्याय देवाने काढला आहे ; पाहा, आह्मी आपल्या धन्याचे दास आहो." योसेफ बोललाः "तसे करणे मजपासून दूरच असो; ज्याजवळ प्याला सांपडला तोच माझा दास होवो, परंतु तुह्मी आपल्या बापाकडे सुखरूप जा." तेव्हां यहूदा ह्मणालाः "माझ्या धन्या, कृपा करून आपल्या दासाला एक गोष्ट बोलूं दे. मुलाच्या प्राणासी आमच्या बापाचा प्राण बांधला आहे, तर माझ्या बापाजवळ मी गेलो आणि मूल आमच्या संगतीं नसला. तर आमच्या बापाचे पिकलेले केश खेदाने आमी अधोलोकी पाडणार. अणखी आपल्या बापाजवळ मी या मुलाविषयीं जामीन झालों, तर आतां कृपाकरून या मुलाच्या ठिकाणी आपल्या दासाला राहू दे आणि मलाला आपल्या भावांसंगतीं जाऊ दे. कांकी मूल मजसंगती नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊं? गेलो तर जे वाईट माझ्या बापाला होईल ते पाहवे लागेल. ३. तेव्हां योसेफाच्याने आपणाला अणखी आकळवेना; तो रडतां मोठ्याने ह्मणालाः “मी योसेफ, माझा बाप अझून जीवंत आहे काय?" तेव्हां त्याच्या भावांच्याने त्याला उत्तर देववेना, कांतर ते घाबरले. मग योसेफ ह्मणालाः "तुह्मी माझ्याजवळ या, मी तुमचा भाऊ योसेफ आहे. ज्याला तुह्मी मिसरांत विकत दिले तो मी आहे, तुह्मी मला इकडे विकले