पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २४] योसेफ आपल्या भावांस ओळख देतो. निमित्त ठेवायास व आह्मास दास करायास आह्मास त्याने आतां आणले आहे. मग त्यांनी पहिला पैका द्यावयास कारभाऱ्याकडे आणला. तेव्हां तो ह्मणालाः “भिऊ नका तुमचा देव आणि तुमच्या बापाचा देव याने तुमच्या गोण्यांत तुह्मास ठेव दिली, तुमचा पैका मला पोहंचला." मग त्याने शिमोन काढून त्यांच्या जवळ आणला. मग योसेफ घरी आ- ल्यावर ते आपल्या हातची भेट त्याजवळ आणून भूमीकडे त्याला नमले. तेव्हा त्याने त्यांचा समाचार विचारून मटले : “तुमचा मातारा बाप सुखरूप आहे काय ? अझून जीवंत आहे काय ?" ते ह्मणाले: “तुझा दास आमचा बाप सुखरूप आहे." तेव्हां योसेफाने आपला भाऊ बन्यामीन आपल्या आईचा पुत्र याला पाहिले व मटले: “ज्याविषयी तुह्मी मला सांगि- तले तो तुमचा धाकटा भाऊ हाच काय?" अणखी त्याने मटलें: 'माझ्या मुला, देव तुजवर कृपा करो!" तेव्हां योसेफ उतावळा झाला, कांकी आपल्या भावाविषयी त्याची आंतडी कळवळली आणि तो आपल्या खोलीत जाऊन तेथे रडला. नंतर त्याने आपले तोंड धुतले आणि बाहेर येऊन आपणाला आकळले, मग अन्न वाढायास सांगितले. तेव्हां चाकरांनी त्याच्यासाठी व त्या बरोबर जेवणारे मिसरी यांच्यासाठी वेगळे वाढले, कांकीं इत्र्यांच्या बरोबर मिसऱ्यांच्याने जेववेना, कां तर ते चारणजीवी असल्यामुळे मिसऱ्यांस त्यांचा कंटाळा आहे. तेव्हां ते योसेफापुढे वडील आपल्या वडीलपणाप्रमाणे, आणि धाकटा आपल्या धाकटेपणाप्रमाणे बसले ह्मणून त्यांनी एकमेकांकडे विस्म- याने पाहिले. मग योसेफाने आपल्या पुढून यांच्यासाठी वांटे काढले, परंतु सर्वांच्या वांच्यापेक्षां बन्यामीनाचा वाटा पांचपट मोठा होता. प्रक० 2४. योसेफ आपल्या भावांस ओळख देतो. (उत्प० ४४ व ४५). १. योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा दिली कीः" या मन- व्यांस नेववेल तितके धान्य त्यांच्या गोण्यांत भर, आणि एकेकाचा पैका त्याच्या गोणीच्या तोडी घाल, आणि धाकट्याच्या गोणीच्या तोडी माझा याचा प्याला घाल." त्याने तसे केले. आणि सकाळ उजाडतांना ती मनष्ये आपली गाढवे घेऊन चालती झाली. ते नगरांतून निघून दर गेले नव्हते इतक्यांत योसेफ कारभाऱ्याला बोललाः "उठ, त्या मनुष्यांच्या पा-