पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ योसेफाच्या भावांचा मिसरास दुसरा प्रवास. [प्रक० २३ योसेफ नाहीं आणि शिमोन नाहीं, बन्यामिनालाही तुह्मी घेऊन जाणार; ही अवघीं मजवर आली आहेत! प्रक० 23. योसेफाच्या भावांचा मिसर देशास दुसरा प्रवास. (उत्प० ४३). - १. देशांत तर दुकाळ भारी झाला, आणि त्यांनी जे धान्य आणले होते ते त्यांनी खाऊन संपविल्यावर त्यांचा बाप त्यांस ह्मणालाः "पुन्हा जाऊन आह्मासाठी थोडे अन्न विकत घ्या!” मग यहूदा त्याला ह्मणाला: "या माणसाने आह्मास खरावून सांगितले की, तुमचा भाऊ तुमच्या संगतीं नसला तर तुमच्या दृष्टींस माझे तोंड पडणार नाही. आमच्या भावाला आमच्या संगती पाठविले, तर आह्मी उतरूं व तुजसाठी अन्न विकत घेऊ; परंतु जर पाठवीत नाहींस, तर आह्मी उतरणार नाही.” इस्राएल बोललाः "तुह्माला आणखी भाऊ आहे हे त्या माणसाला सांगून माझे वाईट का केले!" ते ह्मणाले: “त्या माणसाने आमच्या गोत्राविषयी चौकशीने विचारिलें. आपल्या भावाला खाली आणा, असे तो सांगेल, हे आमाला कळले होते काय?" तेव्हां यहूदा आपल्या बापाला ह्मणालाः “मजसंगतीं मुलाला पाठीव: मी त्याविषयीं जामीन होतो, तूं त्याला माझ्या जवळ माग, म्या त्याला तुजकडे न आणले तर मी सर्वदां तुझा अपराधी होईन." तेव्हा इस्राएल ह्मणाला : “असे आहे तर आपल्या भावाला घ्या आणि या देशांतील निवडक पदार्थ त्या माणसास भेट खाली न्या, डीक व मध, सुगंध द्रव्य व बोळ, पिस्ते व बदाम, हीं न्या. आणि दुप्पट पैका ध्या, तुमच्या गोण्यांच्या तोंडी जो पैका परत आणला तो फिरून न्या, कदा- चित् ती चूक झाली असेल ; आणि सर्वसमर्थ देव त्या माणसाच्या दृष्टीत तुह्मावर दया करो व तुह्मासंगतीं तुमचा दुसरा भाऊ व बन्यामीन यांस माघारे पाठवो!" २. मग ते मिसरांत उतरले व योसेफासमोर उभे राहिले. तेव्हां यो- सेफाने त्यांस आपल्या घरी न्यायाला आणि त्यांच्यासाठी जेवण सिद्ध करायाला आपल्या घरच्या कारभाऱ्याला आज्ञा दिली. तेव्हां ते भ्याले व ह्मणाले: “जो पैका आमच्या गोण्यांत परत दिला, त्याकरितां आह्मावर