पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

योसेफाच्या भावांचा पहिला प्रवास. [प्रक० २२ त्याच्यापुढे लोकांनी ललकारिलें. आणि फारोने त्याचे नांव सफ नथपनेह (जगाचा तारणारा) असे ठेविले. योसेफ सर्व मिसर दे- शावर नेमला गेला, तेव्हां तो तीस वर्षांचा होता. नंतर योसेफ निघून अवघा मिसर देश फिरला. आणि त्याने या सात चांगल्या वर्षांतून समुद्राच्या वाळू इतकें पुष्कळच धान्य गोळा केले. नंतर दुकाळाची सात वर्षे लागली तेव्हां सर्व देशामध्ये दुकाळ झाला. मग रयत फारो- जवळ अन्नासाठी ओरडली, तेव्हां तो बोललाः “योसेफाकडे जा, तो तुह्मा- ला सांगेल तसे करा." आणि सर्व देशांतील लोक मिसरांत योसेफाकडे विकत घ्यायास आले. आणि योसेफाला दोन पुत्र झाले; एकाचे नांव मनश्शे आणि दुसऱ्याचे नांव एफ्राइम असीं होती. सूचना.-प्रभू येशू ख्रीस्तही नीच होऊन उंच झाला,-सेवा करण्या- कडून सत्ताधारी आणि जगाचा तारणारा असा झाला, तो देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि ज्यांस न्यायीपणाची भूक लागली त्या सर्वांचे जीवनाच्या भाकरीने तो पोषण करितो, त्यासमोर सर्वांचे गुडघेही टेकतील. प्रक० 22. योसेफाच्या भावांचा मिसर देशास पहिला प्रवास. ( उत्प० ४२). १. खनानदेशांतही दुष्काळ होता. आणि याकोबाने पाहिले की मिस- रांत धान्य आहे, तेव्हां तो आपल्या पुत्रांस ह्मणाला: "तिकडे उतरून जा व तेथून आमासाठी धान्य विकत घ्या, ह्मणजे आपण न मरतां जगं. परंतु योसेफाचा भाऊ बन्यामीन याला आपल्या भावांसंगतीं याकोबाने जाऊ दिले नाहीं, कां तर त्याला वाटले कदाचित् त्याला अपाय होईल. तेव्हां धान्य विकत घ्यायास इस्राएलाचे पुत्र आले व आपली तोंडे योसे- फासमोर भूमीकडे करून त्याला नमले. तेव्हां योसेफाने आपल्या भावां- स पाहून ओळखले, परंतु त्यांस आपण अनोळखी असे दाखविले आणि त्यांसी कठोर भाषण करून त्यांस मटले: “तुह्मी कोठून आलां"? ते ह्मणाले : “आह्मी अन्न विकत घ्यायास खनानदेशाहून आलो." तेव्हां योसेफाने त्यांविषयीं जी स्वमें आपण पाहिली होती ती अठविली आणि