पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २१] योसेफाचे उंच पदवीस चढणे. राध अठवितो. फारो आपल्या चाकरांवर रागे भरला होता आणि त्याने मला व मजबरोबर स्वैपाक्यांच्या नायकाला बंदांत घातले, मग एका रात्री आह्मी स्वप्न पाहिले, तेव्हां तरणा इब्री तेथे आमच्या संगतीं होता, त्याने आमच्या स्वप्नाचा अर्थ आह्मासाठी काढला, त्याप्रमाणे घडले, राजाने मला माझ्या कारभारावर पूर्ववत् केले आणि त्याला टांगले." २. तेव्हां फारोने पाठवून योसेफाला कैदखान्यांतून बोलावून आणले. तेव्हां योसेफ हजामत करून व आपले वस्त्र बदलून फारोकडे आला. तो त्याला ह्मणालाः “म्या स्वप्न पाहिले, परंतु त्याचा अर्थ काढणारा कोणी नाहीं, तथापि म्या तुजविषयी असे ऐकले आहे की, तूं स्वप्न ऐकून त्याचा अर्थ काढतोस." योसेफाने उत्तर केले की: "माझ्याठायीं नाहीं, देव फारोला सुखाचे उत्तर देईल." तेव्हां फारोने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. त्यावर योसेफ फारोला ह्मणालाः "स्वप्न एकच आहे; देव जे करणार ते त्याने फारोला दाखविले आहे: पाहा, सर्व मिसर देशांत मोच्या सुकाळाची सात वर्षे येत आहेत, आणि त्यानंतर दुकाळाची सात वर्षे येतील. मग मिसर देशांत सुकाळ अगदी विसरतील आणि दुका- ळ देशाचा क्षय करील, आणि ही गोष्ट देवाकडून ठरली आहे व ती देव लवकर सिद्धीस नेणार आहे, यावरून फारोला दोन वेळा स्वप्न झाले. तर आतां फारोने बुद्धिमान व शहाणा मनुष्य पाहून त्याला मिसर देशावर ठेवावे. त्याने सुकाळाची सात वर्षे मिसर देशांतला पांचवा हिस्सा घ्यावा, आणि सात चांगल्या वर्षांतील अन्न गोळा करून दुकाळाच्या सात वर्षां- साठी कोठारांत साठवून ठेवावे." ____३. ही गोष्ट फारोच्या दृष्टींत व त्याच्या सर्व चाकरांच्या दृष्टींत बरी वाटली. मग फारो बोललाः “ज्यामध्ये देवाचा आत्मा आहे असा तजसा- रखा मनुष्य आमास मिळेल काय ? देवाने तुला हे सर्व कळविले आहे, यावरून तुझ्यासारखा बुद्धिमान् व शहाणा कोणी नाही. तूं माझ्या घरावर होसील आणि माझे सर्व लोक तुझ्या आज्ञेप्रमाणे वर्त्ततील, राजासनावर मात्र तुजपेक्षां मी मोठा होईन." तेव्हां फारोने आपली मुद्रा आपल्या हा- तांतन काढून योसेफाच्या हातांत घातली, त्याला स्वच्छ पांढरी वस्त्रे लेवविली आणि त्याच्या गळ्यांत सोन्याची कंठी घातली. मग आपल्या रथांत त्याला बसविले. आणि "अब्रेक" ह्मणजे गुडघे टेका। जो 71