पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ योसेफाचे उंच पदवीस चढणे. [प्रक० २१ तीन पांढऱ्या टोपल्या होत्या, आणि वरील टोपलीत भाजून केलेली फारोची सर्व प्रकारची पक्काने होती, आणि पांखरांनी ती माझ्या डोक्यावरल्या टोपलीतून खाली. तेव्हां योसेफाने उत्तर दिले: "त्याचा अर्थ असा, त्या तीन टोपल्या तीन दिवस आहेत, तीन दिवसांनी फारो तुजवरून तुझे डोके वर करील व तुला झाडावर टांगील, आणि पांखरे तुजवरून तुझें मांस खातील.” आणि तिसऱ्या दिवसी फारोचा जन्मदिवस होता. तेव्हां याने पाजणान्यांच्या नायकाला त्याच्या कामावर पूर्ववत् बसविले, परंतु स्वैपाक्यांच्या नायकाला टांगले.तथापि पाजणान्यांच्या नायकाने योसेफाची अठवण ठेवली नाहीं, तो त्याला विसरला. सूचना.- योसेफाच्या चाकरी करण्यावरून व कैदेत असण्यावरूनही अनेक गोष्टी येशूच्या चरित्रास मिळतात. येशूनेही नीच होऊन सेवा केली,तो खोट्या साक्षीकडून न्यायांत हरला, त्याजबरोबर दोन अपराधी सदोष ठरून शिक्षेस पात्र झाले, त्यांतील एकावर कृपा · करून त्याने त्याला उद्वारिले. प्रक० २१. योसेफाचें उंच पदवीस चढणे. (उत्प० ४१). १. दोन वर्षांनंतर फारोला स्वप्न पडले की, तो नदीजवळ (नील- नदी) उभा होता, तेव्हां सात गायी दिसण्यांत सुंदर व अंगाने पुष्ट अशा नदीतून वर आल्या, आणि त्यांच्या मागून दुसऱ्या सात गायी दिसण्यांत कुरूप व अंगाने शुष्क वर आल्या, आणि त्यांनी त्या सुंदर व पुष्ट सात गायी खाऊन टाकिल्या, तरी त्या त्यांच्या पोटांत गेल्या असे कळेना, तर यांचे रूप पहिल्याप्रमाणे वाईट राहिले. मग फारो जागा झाला आणि फिरून झोपी गेला. तेव्हां स्वप्नांत असे पाहिले की, सात भरदार व चांगली कणसे एका ताटावर उपजलीं, आणि त्यांच्या मागून रिती व करपलेली असीं सात कणसे निपजली आणि त्यांनी ती सात भरदार व पूर्ण कणसे गिळली. मग फारो जागा झाला. नंतर सकाळी त्याचे मन चिंतातूर होऊन त्याने पाठवून मिसरांतील सर्व जोतिषी व सर्व चतूर यांस आणविले. परंतु त्याच्या स्वप्नाचा अर्थ फारोला कोणाच्याने सांगवेना. मग पाजणान्यांचा नायक फारोला असे ह्मणालाः "आज मी आपले अप-