पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २०] योसेफ दास व कैदी झाला. णसांस बोलावून त्यांस मटले की: “पाहा, त्याने (नवऱ्याने) इब्री माणसाला आमची थट्टा करायास आमच्या जवळ आणले आहे, तोमज पासीं निजा- यास मजकडे आला, मग मी मोठ्याने ओरडले, तेव्हां तोआपले वस्त्र मज- जवळ सोडून पळत निघाला." मग त्याचा धनी घरीं आला, तेव्हां ति- ने त्याला याचप्रमाणे सांगितले, आणि त्याजवरून त्याचा राग पेटला. यास्तव याने त्याला धरले आणि ज्या ठिकाणी राजाचे बंदिवान बंदांत होते त्या बंदिशाळेत त्याला घातले. परंतु परमेश्वर योसेफासंगतीं होता आणि त्याने त्याजवर दया केली व त्याला बंदिशाळेच्या अधिकाऱ्याच्या दृष्टींत कृपा दिली की, त्याने बंदिशाळेतील सर्व बंदिवान योसेफाच्या हा- तांत दिले,आणि तेथे त्यांनी अवघे जे केले त्याचा करावणारा योसेफ होता, कांकी परमेश्वर त्याच्या संगतीं होता आणि जे काहीं तो करी ते परमेश्वर साधू देई. २. या गोष्टांनतर असे झाले की, मिसरी राजाचा पाजणारा व स्वै- पाकी यांनी आपला प्रभु याचा अपराध केला. यास्तव त्याने दोघांस बंदि शाळेत घातले. नंतर त्या दोघांनी एका रात्री आपआपले स्वप्न पाहिले. मग सकाळी ते उदास झाले होते, असे योसेफाने पाहून त्यांस विचारले की: "आज तुमची तोंडे का उतरली?" मग ते त्याला ह्मणाले : "आ- ही स्वप्ने पाहिली आणि त्याचा अर्थ काढणारा कोणी नाही." तेव्हां योसेफ यांस ह्मणाला : "अर्थ काढणे देवाकडे नाही काय? तरी ती मला सांगा बरे." मग पाजणान्यांच्या नायकाने आपले स्वप्न सांगून झटले की: "मज- समोर द्राक्षवेल होता आणि द्राक्षवेलाचे तीन फांटे होते. तेव्हां तो फुट- ल्यासारखा झाला, आणि फुलवरा येऊन त्याच्या घडाची द्राक्षे पिकली. म्या द्राक्षे घेऊन ती फारोच्या प्याल्यांत पिळलीं मग प्याला फारोच्या हाती दिला.” तेव्हां योसेफ त्याला ह्मणालाः "याचा अर्थ असा ते तीन फोटे तीन दिवस आहेत ; तीन दिवसांनी फारो तुझे डोके वर करील व तुझ्या कारभारावर तुला पूर्ववत् बसवील. आणि तुझे बरे होईल तेव्हां तूं अगत्य माझी अठवण कर, आणि मजवर दया करून माझे नांव फारोला सांग,आणि मला या घरांतून काढ, कांतर त्यांनी मला कैदेत ठेवावे असे म्या कांहीं केले नाही." मग स्वैपाक्यांच्या नायकाने अर्थ चांगला आहे हे पाहन योसेफाला मटले. "मीही आपल्या स्वप्नांत असतां पाहा, माझ्या डोक्यावर