पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १९] योसेफ व त्याचे भाऊ. आणि पाहा, माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुमच्या पेट्या तिच्या भोवते येऊन माझ्या पेढीला नमल्या." तेव्हां याचे भाऊ त्याला बोलले. "तूं आह्मावर खचीत् राजा होसील काय? आह्मावर धनीपण करसीलच खरें?" मग त्यांनी अधिकच त्याचा द्वेष केला. नंतर योसेफाने आणखी स्वप्न पाहिले व तेही आपल्या भावांस सांगितले. "पाहा, मला आणखी स्वप्न पडले की, सूर्य व चंद्र व अकरा तारे मला नमले." तेव्हां याविषयीं ऐकून त्याच्या बापाने त्याला दोष लावून मटले: “त्वा हे काय स्वप्न पाहिले? मी व तुझी आई व तुझे भाऊ तुला भूमीकडे नमायास येऊ काय?" आणि त्याच्या भावांनी त्याचा हेवा केला, परंतु त्याच्या बापाने ती गोष्ट मनांत ठेविली. २. नंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारायाला शखेमास गेले, मग याकोबाने योसेफाला मटले : "आतां तूं जाऊन आपल्या भा- वांचा व कळपांचा समाचार पाहून मला वर्तमान आण." आणि त्यांनी त्याला दुरून येतां पाहिले तेव्हां ते एकमेकांस ह्मणाले: “पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे, तर आतां चला, आपण त्याला जीवे मारूं आणि ह्मणूं : त्याला जनावराने खाले आहे ; मग त्याच्या स्वप्नाचे काय होईल हे पाहं," है ऐकून रऊबेनाने त्याला त्यांच्या हातांतून सोडवायास आणि त्याच्या बापाकडे त्याला पाठवायास ह्मटले की : "रक्त पाडूं नका, तर रानांतील या खांचैत त्याला टाका. आणि योसेफ आपल्या भावांजवळ आल्यावर त्यांनी त्याचा चित्रविचित्र झगा काढून घेतला आणि त्याला धरून खांत टाकले, पण खांचेंत पाणी नव्हते. मग ते भाकर खायास बसले. इतक्यांत पाहातात तो इश्माएलांचा काफला आला. सगंध द्रव्य व डीक व बोळ वाहून ते मिसरांत जात होते. तेव्हां यहदा आपल्या भावांस ह्मणालाः "आमी आपल्या भावाला मारले तर लाभ काय? चला, आपण त्याला इश्माएल्यांस विकू, आणि आपला हात त्याज- वर नसावा, कां तर तो आपला भाऊ आहे." मग त्याच्या भावांनी ऐकिलें. आणि त्यांनी योसेफाला खांचेतून ओढून काढले व वीस रूपयांला त्याला दहमाल्यांस विकले. मग रऊबेन खांचेकडे परत आला, आणि खांचंत योसेफ नाही हे पाहून त्याने आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या भावाकडे परत येऊन ह्मणाला: "मुलगा नाही, तर मी कोणीकडे जाऊं?" मग