पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ योसेफ व त्याचे भाऊ. [प्रक० १९ टलें अंत:करणही घेऊन निघाला. येणेकडून दूतासी झावी करण्यांत तो प्रवल झाला आणि एसावासों जी हांची करायाची असे त्याला वाटले होते, ती द्यावी करण्याकारता त्याला धैर्य येण्यास हेच कारण झालें. २. याकोबाने आपली दृष्टी वर करून पाहिले की एसाव आला, आणि त्यासंगती ४०० माणसे. मग तो त्याला भेटायास जाऊन सात वेळ भूमीकडे नमला. आणि एसावही याकोबाला भेटायास धावला, आणि त्याने याला आलिंगन दिले व त्याच्या मानेवर पडून त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले. तेव्हां याकोवाने मटले: “मी तुझ्या दृष्टींत कृपा पावलो तर माझ्या हातची भेट घे." पहिल्याने एसाव ती घेईना, परंतु या कोबाच्याफारआग्रहामुळे त्याने ती घेतली.मग एकमेकांचे क्षेमकुशल झाल्या. नंतर एसाव आपल्या ठिकाणास परत गेला. आणि याकोव शखेमास जाऊन तेथे नगरासमोर त्याने आपला डेरा दिला. तो भूमीचा तुकडा त्याने विकत घेतला आणि त्यावर त्याने वेदी बांधली. त्यानंतर देवाने याकोबाला सांगितले की: "उठ, बेथेलास जाऊन तेथे राहा,आणि तूं आपल्या एसाव भावासमोरून पळालास, तेव्हां ज्या देवाने तुला दर्शन दिले त्यासाठी तेथें तुझ्या नवसाप्रमाणे वेदी बांध." मग याकोबाने तसे केले. नंतर याकोब आपला बाप इझाक मने एथे राहत होता त्याकडे आला. इझा- काचे दिवस तर १८० वर्षे झाली होती, तेव्हां तो मातारा व दिवसांनी पुरा होऊन प्राण साडून मेला आणि आपल्या लोकांत मिळाला, आणि त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्याला पुरिले. प्रक० १९. योसेफ व त्याचे भाऊ. (उत्प० ३७ ). १. याकोबाचा पुत्र योसेफ सत्रा वर्षांचा असतांआपल्या भावांसंगती कळप चारात होता. तो आपल्या भावांच्या दुष्टाईविषयीं बापाजवळ बोलत असे, आणि याकोबाने आपल्या सर्व पुत्रांमध्ये योसेफावर प्रीति केली, कां की हा त्याचा मातारपणाचा पुत्र होता, आणि त्याने त्यासाठी विचित्र झगा केला. आणि त्याच्या भावांनी हे पाहिले, यास्तव त्यांनी त्याचा द्वेष केला आणि त्यांच्याने त्यासी सुखाने बोलवेना. आणखी योसेफाने एका वेळेस स्वप्न पाहिले, तेव्हां तो त्यांस ह्मणालाः “जे म्या पाहिले ते हे स्वप्न कृपाकरून ऐका. पाहा आह्मी शेतांत पेट्या बांधीत होतो,