पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १८] याकोबाचे स्वस्थानास परत येणे. ४३ देवा, परमेश्वरा, तूं मला बोललास की: 'तूं आपल्या देशास जा.' ज्या दया आणि सत्यता ला आपल्या दासावर केल्या त्या सर्वांस मी अयोग्य आहे, कां तर मी आपली काठी घेऊन ही यार्देन उतरलो आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या. तूं कृपा करून माझा भाऊ एसाव याच्या' हातांतून मला सोडीव. तूं बोललास, 'मी तुझे बरे करीनच आणि तुझें संतान वाढवीन." मग आपल्या जवळ जे होते त्यांतून त्याने एसावासाठी भेट घेतली आणि आपल्या भावाकडे पाठविली. मग त्या रात्री उठूनआप- ल्या बायका व लेकरें व सर्व धन हीं उतारापलिकडे याकोबाने पोचविलीं, आणि आपण एकला राहिला. आणि पाहाट होईपर्यंत कोणी त्यासी झोबी केली; आणि त्याला जिंकले नाही, असे पाहून तो त्याच्या मांडीच्या खोलग्याला शिवला. आणि याकोब त्यासी झोंबी करीत असतां याको बाच्या मांडीचा खोलगा उखळला. मग तो पुरुष ह्मणालाः "पाहाट झाली तर मला जाऊ दे," परंतु याकोब ह्मणालाः “मला आशीर्वाद दिल्या- वांचून मी तुला जाऊ देणार नाही.” मग तो त्याला ह्मणालाः "तुझे नांव काय?" तेव्हां याने मटले: “याकोब.” तो बोललाः "तुझे नांव यापुढे याकोब नाही, तर इस्राएल (देवासी झोंबणारा )असे ह्मणतील, कां की तूं देवासी आणि मनुष्यांसी पराक्रम करून जय पावलास;" आणि त्याने तेथे त्याला आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणाचे नांव पनिएल (देवाचे मुख) ठेवून झटले की: "देवाला समक्ष पाहिले असतां माझा प्राण वांचला" मग सूर्य उगवला आणि याकोब आपल्या मांडीत लंगडत चालला *). __*) याकोबासों ज्या पुरुषाने झोवो केली तो प्रभूचा दूत होता. होशेह जो भविष्य- वादी तो या गोष्टीविषयीं असें ह्मणतो की, "त्याने (या कोवाने) आपल्या सामर्थ्याने देवासी पराक्रम केला. होय तो दूतासी पराक्रम करून प्रबल झाला. त्याने रडन त्याजवळ विनंती केली (होशह १२:३,४).-आतापर्यंत याकोवाने बहुत कपट, खोटेपणा व ठक- बाजी करून आपली कार्य साधली, आणि तेणेकरून तो देवाच्या रागास पात्र झाला. झणून देवाने स्वतः त्याचा बैरी होऊन त्याला आडविलें. प्रथमतः याकोवाने आपल्या स्वाभाविक हिम्मतीने व शक्तीने देवासों झोंबी केली, परंतु त्याच्या मांडीचा खोलगा उख. कला यामुळे तो शक्तिहीन झाला. तेव्हां त्याने रडून देवाची प्रार्थना केली. ज्या उपायाने देव मनुष्यास अनुकूळ होतो, तो उपाय नम्रतेने प्रार्थना करणे होय. त्या शस्त्राच्या योगाने याकोब प्रवल होऊन देवाचा राग अव्हेरिला, आणि ज्या नाशास तो पात्र झाला होता तो चुकवून प्रभूपासून आशीर्वाद पावला. या झाबोंतून याकोव जसें नवें नांव तसेंच पाल-