पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १७] लाबानापासीं याकोबाचे चाकरीस राहणे. ४१

  • ) वधूवर तुरका घालून तिला वराच्या स्वाधीन करावी असी त्या देशातील रीत

होती. याकोबाने आपला बाप इझाक याला जसें ठकविले, त्याप्रमाणेच लाबानाने याको- वाला ठकवि लें; आणि ज्याला आशीर्वाद देऊं नये ह्मणन इझाकाला . वाटले होते त्या- लाच त्याने आशीर्वाद दिला, त्याप्रमाणे जी नको होती, तिजबरोबर याकोबाचे लग्न ला- गले. तथापि योग्य जो त्याला जसा इझाकाने आशीर्वाद दिला, तसी यथायुक्त जी ती लेआ- च होती. कारण ज्याकडून तारणाविषयीं वचनाचा अनुक्रम चालला, त्या पुत्राची आई प्रिय राहेल ही नव्हे, तर तुच्छ मानलेली लेआच होय. . २. याकोबाची चाकरी पूर्ण झाली, तेव्हां याकोब लाबानाला ह्मणाला; 'माझ्या बायका व माझी लेकर ज्यांच्यासाठी म्या तुझी चाकरी केली ती देऊन मला रवाना कर, ह्मणजे मी आपल्या देशास जाईन.” तेव्हां 'लाबान त्याला ह्मणालाः "जर तुझ्या दृष्टींत मला कृपा मिळाली तर राहा, परमेश्वराने तुजकरितां मला आशीर्वाद दिला असे म्या अनुभविले आहे. तूं आपलें वेतन नेमून मला सांग, मग मी देईन.” तेव्हां याकोब बोललाः "तुझ्या कळपामधून प्रत्येक ठिकला व विचित्र, ह्मणजे मेंढरांतील प्रत्येक भोरे मेंढरूं आणि शेळ्यांतील विचित्र व ठिकली ती माझे वेतन होतील." तसे याकोबाने कळप मिळविण्याकरितां अणखी साहा वर्षे चाकरी केली, आणि जरी लाबानाने याकोबाचें वेतन दहा वेळां पालटले, तरी तो फार वाढला आणि त्याचे कळप आणि दास व दासी आणि उंट व गाढवे बहुत होती. आणि लेआ ही रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इसाखार, जबुलुन हे साहा पुत्र प्रसवली. याकोबाच्या दोघी बायकांस दोन दासी होत्या, त्या दासी याकोबाच्या उपपन्या झाल्या, आणि त्या प्रत्येक दासीपासून दोन दोन, असे दान, नाफ्ताली, गाद, आणि आशेर या नांवांचे चार पुत्र झाले. शेवटी देवाने राहेल इची आठवण केली आणि तिचे ऐकून विला सफळ केले. मग ती योसेफ आणि पुढे खनान देशांत बन्यामीन या दोन पुत्रांस प्रसवली. ___३, परंतु याकोबाची संतती व धन पाहून लाबान व त्याचे पुत्र याकोबाचा मत्सर करूं लागले. तेव्हां परमेश्वराने याकोबास सांगितलें की: "तूं आपल्या वाडवडिलांच्या देशास परत जा, आणि मी तुजसंगतीं असत जाईन." तेव्हां याकोबाने राहेल व लेआ यांस शेतांत बोलाविले व तो त्यांस ह्मणाला: “मी तुमच्या बापाचे तोड पाहिले की, जसे पूर्वी होते तसे ते मजकडे नाही. तथापि देवाने त्याला माझे वाईट' करू दिले नाही." 61