पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० लाबानापासीं याकोबाचें चाकरीस राहणे. प्रक० १७ ळकांस मटले : "माझ्या भावानो, तुह्मी कोठले?" ते ह्मणाले : “आह्मी हारानांतील आहो." तो त्यांस ह्मणाला : "नाहोराचा पुत्र लाबान याला तुह्मी ओळखतां काय?" ते ह्मणाले : "आमी त्याला ओळखतो आणि पाहा, त्याची कन्या राहेल मेंढरे घेऊन येत आहे." तेव्हां याकोबाने जवळ येऊन विहिरीच्या तोंडावरून धोडा लोटला आणि लाबान याच्या मेंढरांस पाजले. तेव्हां याकोबाने राहेल इचे चुंबन घेतले आणि तो मोठ्याने रडूं लागला. आणि मी तुझ्या बापाचा भाऊ व रिकेचा पुत्र आहे असे याकोबाने राहे- लीला सांगितले. मग धावून तिने ते आपल्या बापाला सांगितले. तेव्हां त्याने त्याला भेटायास येऊन व त्याला आलिंगन करून त्याचे चुबन घेतले आणि त्याला आपल्या घरी आणले. प्रक० १७. लाबानापासी याकोबाचें चाकरीस राहणे. • (उत्प० २९-३१.) १. याकोब लाबानाजवळ महिनाभर राहिला होता, तेव्हां लाबान त्याला ह्मणालाः “तूं माझा भाऊ, ह्मणून खा माझी चाकरी फुकट करावी काय? तुझें वेतन काय आहे हे मला सांग." लाबानाला तर दोघी कन्या होत्या, वडिलीचे नांव लेआ व धाकटीचे नांव राहेल. लेआचे डोळे अध होते, परंतु राहेल सुरूप व देखणी होती. आणि याकोबाने राहेलीवर प्रीति केली, ह्मणून त्याने झटले की: "तुझी धाकटी कन्या राहेल इजसाठी मी तुझी सात वर्षे चाकरी करीन.” तसे याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी केली, आणि त्याच्या तिजवरील प्रीतिमुळे ती त्याला थोडे दिवस असीं वाटली. मग सात वर्षे गुजरल्यावर लाबानाने लग्नाची जेवणा- वळ केली, परंतु राहेलेबद्दल त्याने लेआ त्याला दिली *). या ठकबाजी- विषयीं याकोबाचें लाबानासी बोलणे झाले, तेव्हां लाबान ह्मणाला: "वडिलीच्या पूर्वी धाकटीला द्यावे, असे आमच्या प्रांतांत व्हावयाचे नाहीं. परंतु अणखी सात वर्षे मजपासीं जी चाकरी तूं करसील, तिजमुळे आमी ती तुला देऊ.” याकोबाने तर तसे केले. मग लाबान याने राहेल ही त्याची बायको होण्यासाठी त्याला दिल्ही. आणि परमेश्वराने पाहिले की लेआ नावडती आहे, ह्मणून त्याने तिला सफळ केले, परंतु राहेल वांझ राहिली.