पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इझाकाचे पुत्र. [प्रक० १५ ठावे व आपल्या पुत्राची पारध खावी, मग तुझा जीव मला आशीर्वाद देवो.” तेव्हां त्याचा बाप त्याला ह्मणाला : "तूं कोण आहेस?" त्याने मटले : “मी एसाव तुझा ज्येष्ठ पुत्र.' तेव्हां इझाक फार थरथरां कांपत ह्मणाला : “ज्याने पारध धरली व मजकडे आणली व तूं आल्यापूर्वी मी सीतले खाले आणि त्याला आशीर्वाद दिला आहे, व तो आशीर्वादितच होईल, तो तर कोण?"*) तेव्हां एसाव ह्या गोष्टी ऐकून मोठा आकांत करून ओरडला आणि आपल्या बापाला ह्मणाला : “माझ्या बापा, तुज- पासी हा एकच आशीर्वाद आहे काय? मलाही आशीर्वाद दे." आणि एसाव मोठ्याने रडला, मग इझाकाने झटले, “पाहा, तूं आपल्या तरवारीने जगसील व आपल्या भावाची सेवा करसील; आणि तूं प्रबल होसील, तेव्हां असे होईल की, तूं आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टा- कसील). आणि जो आशीर्वाद याकोबाला मिळाला होता, त्यामुळे एसा- वाने याकोबाचे हाडवैर धरिलें आणि मटले : "माझ्या बापाकरितां शो- काचे दिवस जवळ आहेत, तेव्हां मी आपल्या याकोब भावाला जिवे मा- रीन." मग रिकेने याकोबाला सांगितले : “उठून माझा भाऊ लाबान याकडे पळून जा; आणि तुझ्या भावाचा क्रोध फिरेल तोपर्यंत थोडे दिवस त्यापासी राहा, नंतर मी पाठवून तेथून तुला आणीन. आणि इझाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन सांगितले की: "सर्वसमर्थ देव तुला आशी- र्वाद देवो, आणि तुला सफळ करून बाढयो, आणि तुला अब्राहामाचा आशीर्वाद देवो.” तसे इझाकाने याकोबाला रवाना करून पदनअरामास लाबानाकडे पाठविले आणि त्याला सांगितले : "तूं खनानाच्या कन्यांतील नवरी घेऊ नको, परंतु पदनअरामांत लाबान याच्या कन्यांतली आपणाला नवरी घे."

  • ) प्रथम इझाकाला समजले नव्हते की आपण एसावाला आशीर्वाद देतों में स्वेच्छेने

आणि देवाच्या इच्छेविरुद्ध करितो, परंतु आता तो आपली चूक समजला आणि देवाचं सूत्र आपली योजना अडनीत आहे, असे त्याला दिसून आले, 1) एसायाची संतती, झणजे अदोमो लोक, यांनी सेईर नामक डोंगरी प्रदेश जो मृतसमुद्रापासून आकावा नामें अखातापर्यंत आहे त्यात वस्ती केली, आणि तेथे त्यांनी लूट, व पारध करून आपली उपजीविका चालविली. पुढे दावीद राजाने त्यांचा मोड केला, परंतु फिरून त्यांनी आपणांस स्वतंत्र करून घेतले.