पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ इझाकाचे पुत्र, [प्रक० १५ उठून गेला. तसे एसाव, ज्याला अदोमही ह्मणतात, त्याने आपले ज्येष्ठ- पण तुच्छ मानले. आणि एसाव ४० वर्षांचा झाल्यावर त्याने हित्तींतील दोन बायका करून घेतल्या, त्या इझाक व रिबका यांस आत्म्यांतील कडूपण होत्या. _*) ज्येष्ठ पुत्रांचे हक्क बहुतकरून वतनाचा दुप्पट वांटा, पुरोहितपणा आणि कुटुंबावर अधिकार असे होत (उत्प० ४९, ३). परंतु एथें याहून ज्येष्टपणासंबंधी काही विशेष होते. ते काय म्हणाल, तर वचनदत्त भाशीर्वाद, जो अब्राहामाला मिळाला होता त्याचं वतन. परंतु याची समजूत त्या उग्र एसावास नव्हतो. २. आणि असे झाले की, इझाक मातारा झाला, आणि त्याला दिसेना असे त्याचे डोळे मंद झाले. तेव्हां त्याने आपला वडील पुत्र एसाव याला बोलावून मटले : “पाहा, आतां मी मातारा झालो, माझा मरणाचा दिवस मला कळला नाही, तर तूं आपला भाता व आपले धनुष्य' घेऊन रानांत जा व मजसाठी पारध धर, आणि रुचिकर अन्न मला अवडते तसे मजसाठी करून आण; मग मी खाईन आणि माझ्या मरणापूर्वी माझा जीव तुला आशीर्वाद देईल. आणि रिबका है सर्व ऐकून याकोबाला ह्मणाली: "तूं कळपाकडे जाऊन त्यांतील शेळ्यांची दोन चांगली करडे मजकडे आण, मग मी तुझ्या बापासाठी त्यांचे रुचिकर अन्न त्याला अवडते तसे करीन. मग तूं ते आपल्या बापाजवळ ने, ह्मणजे तो खाईल आणि त्याच्या मरणापूर्वी तो तुला आशीर्वाद देईल. याकोब आपल्या आईला ह्मणालाः "पाहा, माझा भाऊ केसाळ आणि मी गुलगुलीत आहे, कदाचित् माझ्या बापाने मला चांचपले ह्मणजे मी त्याला ठकविणारा असे दिसेन, आणि मी आपणावर आशीर्वाद नाही, तर शाप आणीन." त्याची आई ह्मणाली: "माझ्या पुत्रा, तुजवरचा शाप मजवर असो, केवळ माझी वाणी ऐक.” मग त्याने जाऊन घेतले आणि आपल्या आईकडे आणले, आणि तिने अन्न तयार केले. मग एसाव याची उंच वस्त्रे घेऊन याकोब याच्या अंगावर घातली आणि त्याच्या हातांत व त्याच्या मानेच्या गुलगुलीत ठिकाणी तिने करड्यांची कातडी घातली. मग याकोब ते अन्न आपल्या बापाजवळ आणून ह्मणालाः "माझ्या बापा!" इशाक ह्मणालाः "माझ्या पुत्रा, तूं कोण?" याकोबाने मटले : "मी एसाव तुझा प्रथम पुत्र; त्वा मला सांगितले तसे म्या केले आहे ; कृपाकरून