पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ प्रक० १५ इझाकाचे पुत्र. रिखकेनेही आपली दृष्टी वर केली आणि ती इझाकाला पाहून चाकराला ह्मणाली: “आमास भेटायास शेतांतून चालतो, तो मनुष्य कोण?" चाकर ह्मणाला : "तो माझा धनी आहे." नंतर चाकराने आपण में केले होते ते सर्व इझाकाला सांगितले. मग इझाकाने रिकेला आपली आई सारा इच्या डेऱ्यांत आणले आणि ती त्याची बायको झाली, आणि त्याने तिजवर प्रीति केली.-अब्राहाम तर १७५ वर्षांचा वृद्ध व पुरा होऊन चांगल्या मातारपणीं प्राण सोडून मेला आणि आपल्या लोकांत मिळाला; आणि त्याचे पुत्र इशाक व इश्माएल यांनी त्याला माखपेला गुहेत पुरिले. प्रक० १६. इझाकाचे पुत्र. (उत्प० २५-२७.) १. आणि इझाकाने रिबका इला आपणाला बायको करून घेतली, तेव्हां तो ४० वर्षांचा होता. ती तर वांझ असल्यामुळे इझाकाने परमेश्व- रापासी विनंती केली, तेव्हां परमेश्वराने त्याची विनंती मानली आणि तिला सांगितले: “दोन राष्ट्र तुझ्या पोटांत आहेत, आणि वडील धाकट्याची सेवा करील." नंतर प्रसवण्याचे तिचे दिवस पूर्ण झाले, तेव्हां तिला जावळे झाले. पहिला संपूर्ण तांबूस केसांच्या झग्यासारखा होता, आणि त्यांनी त्याचे नांव एसाव ठेवले, आणि धाकट्याचे नांव त्यांनी याकोब ठेवले. नंतर ती लेंकरें वाढली आणि एसाव निपुण पारधी वनचर झाला, याकोब तर गरीब माणूस डेन्यांत राहणारा झाला. इशाकाने एसावावर प्रीति केली, कांतर पारधेची त्याला आवड होती, पण रिबकेने याकोबावर प्रीति केली. एका दिवसी याकोब वरण शिजवीत होता आणि एसाव रानांतून थकून आला होता. तेव्हां एसाव याकोबाला ह्मणालाः "कृपेने ते तांबडे तांबडे यांतून मला खाऊ दे." तेव्हां याकोबाने मटले: “आज तूं आपले ज्येष्ठपण मला विकत दे!" *) एसाव ह्मणालाः “पाहा, मी मरायाच्या लागास आलो आहे, हे ज्येष्ठपण मला कशाला!" याकोबाने मटले: “तूं आज मजसी शपथ कर." मग त्याने त्याजसी शपथ करून आपले ज्येष्ठपण याकोबाला विकत दिले. तेव्हां याकोबार एसावाला भाकर व मसुरांचे वरण दिले, आणि तो जेवला व प्याला. मग