पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- इझाकाचे लग्न. [प्रक० १४ तिच्या हातांसाठी दोन बांगड्या काढून तिला झटले: “तूं कोणाची कन्या? तुझ्या बापाच्या घरी आमास उतरायाची जागा आहे काय?" ती ह्मणाली: “मी बथुवेलाची कन्या आहे. आह्मापासीं पेंढा व वैरण फार, आणि उतरायास जागा आहे." तेव्हां त्या माणसाने लवून परमेश्वराचे भजन केले व झटले: “मी वाटत असतां परमेश्वराने मला माझ्या धन्याच्या भावाच्या घरी आणले आहे त्याची स्तुति असो.” मग रिबका इने धावत जाऊन आपल्या आईच्या घरी या गोष्टी सांगितल्या. ४. आणि रिकेचा भाऊ लाबान याने नथ व आपल्या बहिणीच्या हातांत बांगड्या पाहिल्या आणि रिबका इच्या गोष्टी ऐकल्या, तेव्हां तो त्या माणसाकडे गेला आणि ह्मणालाः “परमेश्वराच्या आशीर्वादिता, आंत ये, बाहेर कशाला राहतोस?" तसेच त्याने त्या माणसाला घरांत आणले व उंट सोडले, नंतर उंटांसाठी पेढा व वैरण दिली आणि त्याचे पाय धुवायासाठी पाणी दिले, मग त्याच्या पुढे जेवायास वाढले. परंतु तो माणूस बोलला: “मी आपली गोष्ट सांगेन तोपर्यंत जेवणार नाहीं." साने झटले“सांग." तेव्हां त्याने अब्राहामाची सर्व हकिकत सांगून व आपले इकडे येण्याचे कारण कळवून त्यांस मटले: “आतां तुह्मी माझ्या धन्यासी दया व सत्यता करणार आहां, तर मला सांगा." तेव्हां लाबान व बथुवेल यांनी असे उत्तर दिले की: "गोष्ट परमेश्वरापा- सून निघाली आहे, पाहा, रिबका तुजपुढे आहे, तिला घेऊन जा; आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ती तुझ्या धन्याच्या पुत्राची बायको होतो." तेव्हां चाकराने त्यांच्या गोष्टी ऐकल्यावर भूमीकडे लवून परमेश्वराचे भजन केले; मग त्याने रुप्याचे डागिणे व सोन्याचे डागिणे व वस्त्रे काढन रिब्केला दिली, आणि तिचा भाऊ व तिची आई यांस उंच वस्तू दिल्या. मग सकाळी उठून तो ह्मणालाः “माझ्या धन्याकडे मला लावून दा. आणि मला उशीर करूं नका." नंतर त्यांनी रिब्केला बोलावून मटलें: "या माणसासंगतीं जातीस काय?" ती ह्मणाली: "जाते." मग त्यांनी रिबका व तिची दाई यांस चाकराबरोबर रवाना केले, आणि रिबकेला आशीर्वाद देऊन ह्मटले: “तू आमची बहीण बहुत हजार असी हो." इझाक तर संध्याकाळच्या वेळेस ध्यान करायास शेतांत गेला; तेव्हां त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले, आणि पाहा, उंट येत आहेत.